
दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि -माणिक सुर्यवंशी
——————————————————————
शाहापुर परिसरातील बहुतांश बागायतदार शेतकऱ्यांनी यावेळी धान्य पिकाची लागवड करत धान्य पिकावर जोर दिला आहे. मागील वर्षी माझ्यासह येथील सात ते आठ मोजक्याच बागातदार शेतकऱ्यांनी कमी खर्चात धान्य पिकाची लागवड करत हेक्टरी १७ ते १८ क्विल्टन एवढे उत्पन्न काढले असल्याने हरभरा ज्वारी पिकापेक्षा थोडा जास्तीचा फायदा झाले असल्याने यावेळी परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी धन्याची लागवड केलेली आहे. , बागायतदार विलास यालावर, शेतकरी, शहापूर
———————————————————————
: देगलुर तालुक्यातील शहापुर येथील बागायतदार शेतकऱ्यांनी हरभरा, करडई, ज्वारी या कोरडवाहू पिकावर भर न देता, यावर्षी शाहापुर परिसरातील जवळपास ४० टक्के शेतकऱ्यांनी धन्याची लागवड केली आहे. धन्याच्या पिकाच्या लागवडीचा खर्च हा इतर बागायती पिकापेक्षा कमी असल्याने व उत्पन्न जास्त निघत असल्याने तसेच उत्पन्न निघत असलेल्या धन्याला बाजार भाव हे बऱ्यापैकी मिळत असल्याने यावेळी शहापुर परिसरातील बागायतदार शेतकऱ्यांनी धन्याचे पिक लागवड करण्यावर जोर दिला आहे. तसेच मागच्या वर्षी धन्य या उत्पन्नाला एका क्लिंटनला १० ते ११ हजार रुपये बाजार भाव मिळाल्यामुळे व त्या तुलनेत येणारा लागवडी खर्च कमी असल्याने येथील बागायतदार शेतकऱ्यांनी धन्याचे पिकाची लागवड करण्याचे निर्णय घेत सर्वाधिक धन्याचे पिकाची लागवड केली आहे. धन्याचे उत्पन्न निघाल्यानंतर निघालेल्या उत्पन्नाला किती बाजार भाव मिळतो? यावर शेतकऱ्यांना नफा तोटा काढता येणार आहे. परंतु सद्यस्थितीत परिसरात सर्वत्र धन्याचे पिंकाचे सुगंध दरवळत व पांढऱ्या शुभ्र फुलाच्या चादरीने पांघरन घातल्या सारखे हे धन्याचे पीक बहरलेले दिसून येत आहे.