
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलुर – जिल्ह्यात नामांकित असलेल्या साधना हायस्कूलच्या चार मुलींची जलतरण स्पर्धेत राज्यस्तरीय निवड
काल 17 डिसेंबर सगरोळी येथे झालेल्या विभागीय जलतरण स्पर्धेत 4×100 रिले प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला असुन त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झालेली आहे
प्रांजल आगलावे,आसावरी सुकने, अदिती सुरनर व समिक्षा येमले
वैकतिक प्रकारात आसावरी सूकने हि 200 मी व 400 मी free style मध्ये विभागातून प्रथम क्रमांक पटकाविला तिची राज्यस्तरीय निवड झाली आहे.
प्रांजल आगलावे ही 200 मी free style मध्ये विभागातून दुसरी आली तिची पण राज्यस्तरीय साठी निवड झाली आहे.
या मुलींच्या घवघवीत यशाबद्दल साधना हायस्कूल चे मुख्याध्यापक व प्रशिक्षक श्री यादव बत्तुलवार यांनी व संस्थेच्या
विश्वस्त मंडळाकडून या चार मुलींचे खुप खुप अभिनंदन करण्यात आले.