
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे रब्बी हंगामाच्या पेरण्या उशिरा झाल्या. आता अचानक हवामाणात बदल झाला वातावरून ढगाळ झाले आणि थंडी गायब झाली.उन्हाचा चटका लागत असून गहू, हरभरा, कापूस, कांदा इत्यादी पिके वाचव ण्यासाठी शेतकरी मोटारपंपाणे पिकाला पाणि देण्यासाठी धडपडत आहे. विजेची लोडशीडींग असल्यामुळे सर्वच शेतकरी रात्री बेरात्री पिकाला पाणि देण्यासाठी परीशान आहेत. सर्व शेतकऱ्यांनी सोबत पंप चालू केल्याने विजेवर कमी जास्तदाबामुळे विजेचे ये,जा चालू असल्यामुळे मोटार स्टार्टर जळत असून शेतकऱ्यांच्या खिशाला झळं बसत आहे.एकाच वेळीस शेतकरी मोटार दुरुस्तीसाठी दुकानात मोटार स्टार्टर घेऊन येत आहे. नायगाव येथील रामगिरी मोटार रेवायडींगचे मालक जी. एम. नाईक, आणि बी. एम. नाईक यांनी माहिती दिली.