
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा –
स्थानिक स्प्रिंगडेलशाळेत आजादी चा अमृत महोत्सव’ या शीर्षकाखाली दिनांक १७ डिसेंबर २०२२ रोजी वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. योगेश कुंभेजकर व डॉ.राजदीप चौधरी उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांनी दीपप्रज्वलन करून वार्षिक स्नेहसंमेलनाला सुरुवात केली. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्कार खासदार श्री.सुनील मेंढे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रमुख पाहुण्यांचा परिचय शाळेचे संचालक खासदार श्री. सुनील मेंढे यांनी करून दिला. विद्यार्थ्यांनी सर्वांगिण विकासासाठी प्रयत्नशील रहावे असे विद्यार्थ्यांना सांगितले. शाळेत होणाऱ्या विविध स्पर्धा व त्यात विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या पारितोषकांचे उल्लेख करून शाळेचा वार्षिक अहवाल शाळेच्या समन्वयीका सौ. ज्योती साहु यांनी सादर केला.
शाळेतील दहावी व बारावीच्या परीक्षेत जिल्हयात बाजी मारणाऱ्या व विविध विषयात प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच शाळेतील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञान व समाजशास्त्र विषयाबद्दल जिज्ञासू वृत्ती जागरूक करण्याकरिता विज्ञान व समाजशास्त्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन श्री विनय अंबुलकर यांनी केले. विज्ञान प्रदर्शनात विज्ञान विषयाशी संबंधित ५० वैज्ञानिक प्रतिकृती समाविष्ट करण्यात आल्या . समाजशास्त्र वर आधारित भारतीय स्वातंत्र्य युद्धातील पन्नास अज्ञात वीरांबद्दल माहिती प्रदर्शित करण्यात आली. शाळेतील विविध कार्यक्रमाबद्दल माहिती पीपीटी सादरीकरणाद्वारे विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहोचविण्यात आली. अध्यक्षीय भाषणा *श्री. योगेश कुंभेजकर* यांनी खेळ व कलागुणांचा विकासावर भर द्यावा व यात सनीज् स्प्रिंगडेल शाळा उत्तम कामगिरी पार पाडतेय असे प्रतिपादन केले व त्याकरीता शाळेचे अभिनंदन केले. डॉ.चौधरी यांनी कोरोना काळातील नकारात्मकते वर मात करून पुढे गेल्याबद्दल सगळ्यांचे कौतुक केले.
आजादी चा अमृत महोत्सव या शीर्षकाअंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांनी पोवाडा सादर केला. प्ले ग्रुप ते दहाव्या वर्गातील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे स्नेहसंमेलनात सहभाग घेतला.
स्नेहसंमेलनात शाळेचे संचालक खासदार श्री सुनील मेंढे , कोषाध्यक्षा सौ.शुभांगी मेंढे,सौ.अनघा आष्टीकर,सौ.वर्षा खोटेले, डॉ. उल्हास फडके, श्री. विनय अंबुलकर , प्राचार्या शेफाली पाल ,प्रायमरी प्रमुख सौ. समृद्धी गंगाखेडकर, प्री प्रायमरी प्रमुख सौ. कल्पना जांगडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी खापरकर यांनी केले.आभार प्रदर्शन सौ.मेधा हलदुकर यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौम्या मेंढे,देवांग सपाटे,सिद्धी भुरावत,सिध्दी भलगट, हेमंत मारवाडे,आलिया शेख,आर्यन बैस,सुभिक्षा कुबडे,कुशाग्रा शर्मा ,आध्या पोफळी,आराध्या चावरीपांडे , मानिनी धैर्या, सनया दिपटे ,अरविका गजघाटे ,तेजोमय कांबळी,लावण्या वैलकर ,परिधी सोनकुसरे ,साची पटेल ,अद्वय जांभुळकर ,मुनिष सांगोडे, समृद्धी झंझाड, युगांत साखरकर ,अभीर पांडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरता शाळेतील शिक्षक वृंद व इतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.