
दैनिक चालु वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी -सुरेश जमदाडे
शहरातील जि.प.मुलींचे हायस्कुल ही गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक व सास्कृंतीक क्षेत्रात प्रगतीपथावर असून सध्या कार्यरत असलेले शाळेचे मुख्याध्यापक एम.आर.कांबळे यांच्याही संकल्पनेनुसार शाळा ही विविध क्षेत्रात आंतरशालेय, तालुका, जिल्हा, विभागीय व राज्य स्तरावर नावारूपाला येत असल्यामुळे या शाळेची दखल घेत दि.१८ डिसेंबर २०२२ रोजी जि.प.हा.(मुलींचे) मुखेड येथ शिक्षण उपसंचालक पुणे दिपक चवणे यांनी त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. जयश्री आठवले प्राचार्या, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था ,नांदेड यांच्यासह सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी इयत्ता दहावी तुकडी (ब) मधिल विद्यार्थीनींना “भौमितिक आकृत्यांचे मूलभूत संबोध” याविषयी मार्गदर्शन केले त्यानंतर शाळेमध्येच उपलब्ध असलेल्या नावीन्यपूर्ण प्रयोग शाळेची पाहणी करून समाधान व्यक्त केले.तसेच इयत्ता नववी ( ब ) मधिल कू.अंजली शिरूळे हीने स्वतः रेखाटलेल्या सुंदर चित्रांचे उपसंचालकांनी कौतुक करून प्रोत्साहन दिले.
यावेळी मुख्याध्यापक एम.आर.कांबळे, सहशिक्षक विश्वांभर जाधव, डाॅ.बरकत उल्ला, अंबादास देशमुख, दिपक लोहबंदे, नागनाथ स्वामी, कल्याण इंगळे, सुधीर शृंगारे, राहूल मेहरकर, पंढरी भालेराव, दिलीप देवकांबळे, बळीराम रूद्रावाड, हरिदास पवार, सचिनसिंह तेहरा, शामसुंदर दारकू, प्रकाश डोईजड, व्यंकटी केंद्रे, विरभद्र बेलुरे, फारूख शहाजोर, आर.पी.पटेल, दिलीप कांबळे, सहशिक्षिका मधुमती लोणीकर, प्रयाग बिचकुंदे, सुरेखा हराळे, श्रीमती आशालता स्वामी, अश्विनी कुलकर्णी, सविता उमाटे, अनुपमा टाकळीकर, आर.पी.जाधव, सेविका श्रीमती अंजना बोईनवाड, हरिबाई केळे यांच्यासह शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.