
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे…
मंठा तालुक्यातील ग्रामीणभागातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठीचे पांदन रस्ते खड्डेमय झाल्याने खड्ड्याच्या रस्त्यावरून ट्रॅक्टर नेतांना व पायदळ जातांना शेतकऱ्यांना कमालीची कसरत करावी लागत आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागात शेतात जाणाऱ्या पांदण रस्त्याची अतिशय बिकट अवस्था आहे. रोज शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना खड्डे तुडवित शेतात जावे लागत आहे. तर खड्डेमय रस्त्यावरून कुठलेही साधन जात नसल्याने दूरवरून शेतीपयोगी साहित्य कापूस डोक्यावर घेवून त्रास सहन करत शेतात जावे लागत आहे. विशेषतः ग्रामीण भागात अनेक पांदण रस्त्याचे मजबुतीकरण व खडीकरण झाल्याचे दिसून येत नाही. बहुतांश रस्ते आजही खडीविना मातीचेच आहे. तर
काही रस्त्यांचे खडीकरण करण्यात आले. अशा रस्त्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष असून रस्त्यांवर मोठमोठी खड्डे पडली आहेत. अशा रस्त्यावरून बैलगाडी, वखर किंवा ट्रॅक्टरसारखे साधन नेणे धोक्याचे ठरत आहे. पावसाळ्याच्या दिवसात पांदण रस्ते खड्डेमय झाले आहेत. शेतकरी त्याच रस्त्याचा वापर करीत पेर णीकरीता व अन्य कामांकरीता त्याच रस्त्याने वारंवार जात असल्याने खड्डेमय रस्त्यावर मोठमोठे जीवघेणे खड्डे पडले आहेत. खड्डे तुडवित शेतकऱ्यांना शेतात जाणे धोक्याचे ठरत आहे. कित्येकदा अशा रस्त्यांवर खड्ड्यामध्ये ट्रॅक्टर किंवा अन्य साधने फसल्याचे प्रकार रोजच दिसून येत आहेत. त्याच रस्त्याने शेतकऱ्याला रोजच जावे लागते. तसेच पेरणी व इतर शेत का- मांकरीता शेतमजूरांना देखील खड्डे तुडवित शेतात जावे लागते. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे पेरणी स्वायाबीन काढणीसाठी हार्वेस्टर ट्रॅक्टर किंवा अन्य साधने शेतापर्यंत पोहचणे कठीण होत असल्याने शेवटी त्रास सहन करीत शेतकरी आपले शेतीचे कामे उरकून घेतात. शेतकऱ्यांना वर्षभरच याच पांदन रस्त्याचा वापर करावा लागत असल्याने अखेर शेतकरी मेटाकुटीस येते. तर रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे वेळेवर होणारी शेतकऱ्यांची कामे उशिरा होत असल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर होत आहे. शासन प्रशासन इतर रस्त्यांकडे लक्ष देते . पण पांदन रस्त्याकडे दुर्लक्ष आहे.