
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा..शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाच्या विविध पिकाची लागवड केली असली तरी मंठा तालुक्यातील काही शेतकरी आरोग्याच्या दृष्टीने मार्केटमधील पामतेल असे भेसळ युक्त तेलामुळे हर्ट अटॅक,बी. पी, असे अनेक आजार उदभवत असून शरीरावर परिणामक दिसून येत आहे.त्याला आळा घालण्यासाठी करडी पिकाचा पेरा वाढला आहे. उत्पन्न होईल चांगल्या प्रतीचे तेल मिळेल महागाई वाढली घरच तेल होईल खर्च वाचेल आणि आरोग्य चांगले राहील्यामुळे दवाखाना पाहण्याची गरज पडणार या दृष्टीने करडी लागवड केली आहे.