
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर( दि.१९) भारतीय जनता पार्टी विमुक्त जाती व भटक्या जमाती आघाडी महाराष्ट्राचे राज्यव्यापी अधिवेशन नागपूर येथे दि.२२ डिसेंबर २०२२ रोजी जंक्शन फंक्शन हॉल ( बहुउद्देशीय सभागृह) जुना कटोलनाका चौक,नागपूर येथे सकाळी १० वाजल्यापासून ते संध्याकाळी ०६ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले. या अधिवेशनात विजा भज कार्यकर्ते यांनी सहभागी व्हावे असे प्राचार्य शंकरराव राठोड हनेगावकर जिल्हाध्यक्ष भाजपा विमुक्त जाती व भटक्या जमाती आघाडी नांदेड यांनी आवाहन केले आहे.
यावेळी या अधिवेशनास महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत व विमुक्त जाती व भटक्या जमाती आघाडीचे प्रदेश अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली व भाजपा प्रदेश सरचिटनिस तथा विमुक्त जाती व भटक्या जमाती आघाडीचे प्रदेश प्रभारी संजय केनेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे.या अधिवेशनास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,चंद्रकांत बावनकुळे प्रदेशाध्यक्ष भाजपा,पंकजाताई मुंडे राष्ट्रीय सरचिटनिस,भागवत कराड केंद्रीय राज्यमंत्री ,अतुल सावे इतर मागास बहुजन कल्याणमंत्री, माजी खासदार विकास महात्मे,मा.आ. श्रीकांत भारतीय, मा.ना.भिकुजी इदाते, पक्षाचे आमदार खासदार तसेच देविदास राठोड सरचिटनिस विमुक्त जाती व भटक्या जमाती आघाडी महाराष्ट्र व इतर पदाधिकारी अधिवेशनात मार्गदर्शन करणार आहेत.
या अधिवेशनासाठी महाराष्ट्रातील भाजपच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती आघाडीचे किमान एक हजार(१०००) प्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.या अधिवेशनात विमुक्त जाती व भटक्या जमतीच्या विविध प्रश्नावर विचार विनीमय होऊन समाजाच्या काही प्रमुख मागण्याचे ठराव मंजूर करण्यात येणार आहेत.ते खालील प्रमाणे
१) ग्रामीण विकास व नगर विकास विभागामार्फत विमुक्त जाती व भटक्या जमातीचे प्रवर्ग निहाय सर्वेक्षण करून लोकसंख्येची जनगननेत नोंद करावी.
२) महाराष्ट्र शासनाच्या विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी अनेक योजना आहेत,परंतू त्या योजनांना आर्थिक तरतूद नसल्यामुळे त्याचा समाजाला कोणताही उपयोग होत नाही म्हणून या सर्व योजनांसाठी आगामी अर्थसंकल्पात लोकसंख्येच्या प्रमाणात आर्थिक तरतुद करावी.
३) जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र हे सहजपणे उपलब्ध व्हावेत व त्यातील जाचक अटी रद्द कराव्यात तसेच सन १९६१ चा पुरावा ही अट रद्द करावे असे अनेक मुद्यावर अधिवेशन होणार असून या अधिवेशनास सर्व पदाधिकारी उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय जनता पक्षाचे विमुक्त जाती व भटक्या जमाती आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य शंकरराव राठोड हणेगावकर यांनी केले आहे.