
दैनिक चालू वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
नागपूर :- वन अधिकारी तथा मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजीराव पवार पाटील साहेब यांना आज दिनांक १८-१२-२०२२ रोज रविवारी नागपूर येथे सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथराव शिंदे साहेब व वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार साहेब यांच्या हस्ते व प्रधान मुख्य वनसंरक्षक व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.सोबत श्री.उद्धवरावजी पवार, श्री.उत्तमराव लोमटे , श्री.रावसाहेब
साहेब, हे होते त्यांना या अगोदर तिन वेळा महाराष्ट्र शासनातर्फे सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले असून या वेळी चौथ्यांदा सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.समाज उन्नती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.मारोतीराव निवृत्तीराव पाटील घोरबांड साहेब यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.