दैनिक चालू वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
नांदेड : – लोहा तालुक्यातील कारेगाव डिव्हीजन मधील व विशेषतः खडकमांजरी फिटरमधील अनेक गावे त्यांमध्ये सायाळ , भांद्रा , वाळकेवाडी , शिवणी , पांगरी सह अन्य गावे राञीच्या वेळी विजपुरवठा खंडीत होत असल्यामुळे शेतकरी सामान्य नागरिक यासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अंधारात रहावे लागत आहे.
वीज ही नागरिकांची मूलभूत गरज आहे. वीज नसल्याने दैनंदिन कामात अडथळे निर्माण होत आहेत. त्यात सध्या दिवस लहान असल्यामुळे दिवसाची सुरुवात उशिरा होते व सूर्यास्त लवकर होत असल्यामुळे अंधार लवकर पडतो. संबंधित गावात राञीच्यावेळी वीज नसल्यामुळे अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.
दिवसभरात विजेचा लपंडाव त्यामुळे शेतकरी हैराण तर राञीच्या वेळी विज गायब झाल्यास महिलांना शेतातुन आल्यावर स्वयंपाकाला अडथळे निर्माण होत असुन खेडेगाव ईन्हटरची सुविधा नसल्यामुळे तोंडावर येऊन ठेपलेल्या दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मेणबत्ती, किंवा खाद्यतेलच्या दिव्यांचा वापर करुन अभ्यासासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे व राञभर विद्युत पुरवठा खंडित असल्याने खेडेगावात शेतीसह अन्य ठिकाणी काम करणाऱ्या सामन्य माणसांची झोप उडाली आहे.
खडकमांजरी फिटरवरील विजपुरवठा राञभर खंडीत करुन तो कारेगाव येथील खडी क्रेशर मिशनला जोडला ( पुरवठा ) केला जात असुन यामध्ये महावितरण कारेगाव डिव्हीजन व खडी क्रेशर यात मिलीभगत असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे.
महावितरण कर्मचाऱ्यांची शेतकऱ्यांना दमदाटी
आमच्या कारेगाव डिव्हीजन मधुन नियमितपणे विजपुरवठा चालु असुन तो खंडीत करण्यात आलाच नाही , परीसरातील काही शेतकरी हा विजपुरवठा खंडीत करत असुन आम्ही पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींच्या नावे गुन्हा दाखल करणार असल्याची महावितरण कर्मचाऱ्यांचा शेतकऱ्यांसह सामन्य व्यक्तींना भ्रमणध्वनीवरूण दबाव
लोकप्रतिनिधीचे याकडे दुर्लक्ष
महावितरण कंपनीच्या विजखंडीत तक्रारी लोकप्रतिनिधीकडे शेतकऱ्यांना केल्या असता राञी नऊ वाजता करायचा असतो का फोन ठेवा उद्या बोलतो नंतर फोन सध्या घेत नाहीत अशी चर्चा शेतकरी बांधवांसह सामन्य जनतेतून ऐकावयास मिळत आहे
तालुक्यातील विज पुरवठ्या संदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांची मनमानी तर लोकप्रतिनिधी बिनकामी असल्याचे चित्र दिसून येत आहे तर आम्ही न्याय नेमका मागावा कोणाकडे असे सामान्य जनतेचे म्हणणे व चिञ दिसुन येत आहे.
