दैनिक चालू वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
नांदेड : – नांदेड शहरातील दातीवाला पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या व आपल्या पोटाची दैनंदिन खळगी भागवत कुटुंबाचा गाडा ओढणाऱ्या गंगाधर वंटेकर यांच्या कन्येची STI पदी निवड झाली असुन या मुलीचा महाराष्ट्रील अन्याय अत्याचार , शिक्षण सामाजिक कार्यात सतत भाग घेणाऱ्या आझाद ग्रुपने सम्मान केला.
कु संजिवणीताई गंगाधर विटेकर यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आज आपल्या आई वडिलांची आशा अपेक्षा व समाजापुढे STI परीक्षा पास होऊन आदर्श निर्माण केला असुन , अंगात जिद्द चिकाटी मेहनत करण्याची ताकद असेल तर माणुस नक्कीच यशस्वी होते असे प्रतिपादन आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भिमाशंकर मामा कापसे यांनी केले व यावेळी संजिवणी ताईच्या पुढील कार्यास सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
यावेळी आझाद ग्रुपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा दिपकभाऊ रायफळे , जिल्हाध्यक्ष प्रभाकर पांडे , तालुकाध्यक्ष रूद्रा पा भोस्कर प्रसादभाऊ पोले , यांची प्रमुख उपस्थिती होती
