
दैनिक चालू वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार :- जेष्ठ समाजसेवक पद्मविभूषण माननीय अण्णा हजारेजी यांच्या सततच्या मागणीनुसार व पाठपुराव्यामुळे भ्रष्टाचार विरोधी सशक्त कायद्या मसुदा व लोकायुक्त कायद्याला दि.१८.१२.२०२२ रोजी माननीय मुख्यमंत्री श्री.एकनाथराव शिंदे साहेब यांनी व मंत्रीमंडळाने या ऐतिहासिक कायद्याला मंजुरी दिली.याबद्दल मा.अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन जिल्हा शाखा नांदेड व महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाच्या वतीने मा.मुख्यमंत्री व महाराष्ट्र शासन आणि सर्व मंत्रीमंडळाचा हा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल हार्दिक अभिनंदन केले असून आभार मानले आहेत.मा.मुख्यमंत्री व संपुर्ण मंत्रीमंडळाला या कायद्याच्या कक्षेत आणणार्या ह्या ऐतिहासिक व धाडसी निर्णय मा.मुख्यमंत्री व मंत्रीमंडळाने घेतल्याबद्दल सर्व स्तरावरून व नागरिकांमधून स्वागत होत आहे.सदर लोकायुक्त चालू हिवाळी अधिवेशनात मंजूर करण्यात येणार आहे.त्यामुळे भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाच्या वतीने व सर्व पदाधिकारी आणि भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाचे सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार व अभिनंदन जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातुन महाराष्ट्र शासनाला निवेदन देऊन आभार मानले आहेत.यावेळी डॉ.बालाजी कोंपलवार , अँड.धोंडीबा पवार, भागवत पपुलवाड,इंजि.चंद्रशेखर अय्यर,प्रा.डाॅ.सौ.कल्पना जाधव, अँड . गोविंद कोतावार, दत्ता तुमवाड, हनमंतराव जवादवार,इंजि.देगलूरकर, व्यंकटी जाधव सिरसीकर हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.