
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार :- केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्रालय भारत सरकारच्या वतीने ग्रामीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या केंद्रीय राज्य मार्ग निधी अंतर्गत कंधार तालुक्यातील जिल्हा सीमेपासून कुरूळा-पोखरणी-गऊळ-आंबुलगा-टोकवाडी-बोरी(बु.)-कागणेवाडी-कळका-मंगनाळी-पेठवडज-सिरसी(खुर्द)-गोणार-येलूर-नारनाळी रोड या १२ कि.मी.च्या रस्ते विकासासाठी १० कोटी रुपये निधी मंजूर करण्यासाठी खासदार श्री प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांनी प्रयत्न करून कंधार तालुक्यातील कुरूळा व पेठवडज सर्कल मधील जनतेला न्याय मिळवून दिला आहे. त्याबद्दल त्यांचे व मोदी सरकारचे (केंद्र सरकारचे) जाहीर आभार मानले आहेत.कंधार- मुखेड रोड ते नांदेड -मुखेड रोड एकमेकांना जोडले गेले आहेत.त्यामुळे प्रवास सुखकर होणार आहे.रस्ते विकासाच्या निधीमुळे या ग्रामीण भागातील रस्त्यांचा कायापालट होणार आहे.त्यामुळे कुरूळा व पेठवडज सर्कल मधील जनतेने खासदार श्री प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांचे जाहीर आभार मानले आहेत.तसेच कंधार -कळका-पेठवडज-मुखेड बस चालू करण्याची मागणी केली आहे.