
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार :- बालकांच्या मूलभूत हक्काचे संरक्षण व्हावे व त्यांच्या शारीरिक व बौद्धिक विकासासाठी व तसेच तान तनाव मुक्ति साठी बालकांचे व त्यांच्या पालकांची समुपदेशन व्हावे, मुला-मुली सोबत आरोग्यदायी विषयावर संवाद साधने आणि ग्रामीण भागातील होणारे बालविवाह व बालविवांचे होणारे दुष्परिणाम यावर पूर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाने शहर व तालुकास्तर, केंद्र स्थर, आणि शाळास्थरांवर सखी सावित्री समिती स्थापित करण्याबाबत चे आदेशित केले होते.
परंतु देशाचे भविष्य असणार्या बालकांचे व बालहीताचे संरक्षण करणाऱ्या शासन निर्णयावर तात्काळ व प्रभावी अंमलबजावणी व्हायला हवी होती परंतु अद्याप कसलीच अंमलबजावणी कोणत्याही स्तरावर झाली नसल्याने (संस्कृतीक अभिव्यक्ती विभाग महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नांदेड) चे पदाधिकारी गजानन तुकाराम जाधव यांनी कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे संबंधित विषयावर तात्काळ व प्रभावी अंमलबजावणी करावी अशी विनंती करत जिल्ह्यातील सर्व शाळास्थरावर समितीने ३ जानेवारी सावित्री बाई फुले यांची जयंती ते 12 जानेवारी जिजाऊ जन्मोत्सव पर्यंत बाल स्वयं संरक्षणाचे प्रात्यक्षिक, आरोग्य विषयक माहिती, बाल विवाहाचे दुष्परिणाम अशा विविध विषयांवर समुपदेशनाचे कार्यक्रम आयोजित करावे असे सांगितले.