
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:देगलूर तालुक्यातील मरखेल येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद शाळा, मरखेल विभागातील रस्ते, अवैध धंद्यासह अन्य मागण्यांसाठी मरखेल येथील नागरिकांनी दि. २१ डिसेंबर २०२२ रोजी मरखेल येथील मुख्य रस्त्यावर रास्तारोको करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी व सर्व विभागप्रमुखांना यासंबंधीचे निवेदन गावकऱ्यांनी दिले.
दिलेल्या निवेदनात, मरखेल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातसध्या वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, याठिकाणी मुबलक औषधी साठा उपलब्ध करून आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करावे, जिल्हा परिषद हायस्कुल याठिकाणी पक्क्या इमारतीचे बांधकाम तात्काळ
करण्यासह या शाळेत शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, तात्काळ शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात यावी, मरखेल येथे सुरू असलेल्या अवैध दारू व मटका या धंद्यामुळेनागरिकांच्या संसाराची राखरांगोळी होत आहे, पोलिसांनी मरखेल येथील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करावे, येथील धार्मिक ठिकानाजवळ सुरू असलेली मांस दुकाने इतर ठिकाणी हटवून, धार्मिक ठिकाणची पावित्य कायम ठेवावे, स्मशानभूमी परिसरात अतिक्रमण हटवून शासनाकडून मृतदेहांची होणारी अवहेलना थांबवावी, मरखेल विभागात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामाची चौकशी करावी अशा मागण्या निवेदनात करण्यातआल्या आहेत.