
दैनिक चालू वार्ता अहमद्पुर प्रतिनिधी- विष्णू पोले.
अहमद्पुर तालुक्यातील सुमठाणा ग्रामपंचायतील सरपंच पदाच्या उमेदवार सुमठाणा येथील समाजिक कार्यकर्ते गंगाराम पोले यांच्या मातोश्री श्रीमती जिजाबाई पोले या विजयी झाल्या आहेत.
संबोधित जनतेला अभिवादन तथा विनम्र पूर्वक आभार प्रकट करताना गंगाराम पोले म्हणाले की,माझ्या गावातील सर्व मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवून तब्बल २७०मतानि माझा विजय केला मी या विजयाला व्यर्थ जाऊ देणार नाही माझ्या गावाचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय आहे .मी मतदानात जे जनतेला आव्हान केले आहे ते सर्व पूर्ण करणार आहे .माझ्या गावातील माझ्या विरोधातील पन् कार्यकर्त्याचा मी विकासात विचार् करणार आहे. माझी निवडनुक् ही वैचारिक मुद्यावर होती निवडणूक संपली ते मुदे मी माझ्या कार्य किर्दीत पूर्ण करणार आहे.माजी सरपंच गणेश भाऊसाहेब पोले यांनी माला गावाच्या विकासाचा विचार करून पाठिंबा दिला त्यान्चा आभारी आहे.त्याच्या मार्गदर्शना खाली मी गावाच्या विकासात भर घालणार आहे.मी पुन्हा एकदा माझ्या गावातील सदस्य,तथा मतदारांचे खूप खूप आभार मानतो.माझ्या सत्कारा साठी उपस्तिथ असलेले भा.ज.पा प्रदेश प्रवक्ते गणेश हाके,मा.आमदार विनायकराव् पाटील,खांदाडे साहेब,साहेबराव पोले,मंगेश पोले,संतोष मुसळे,बळीराम पोले तथा सर्व गावकर्यानचे आभार मानतो.