
दैनिक चालू वार्ता हातकणंगले प्रतिनीधी – कवि सरकार इ़ंगळी
इंगळी .ता. हातकणंगले या गावच्या ग्रामपंचायतीच्या अटीतटीच्या लढतीच्या निवडणूकीत इंगळेश्वर ग्रामविकास आघाडीचे १० उमेदवार विजयी झाले असून आघाडीचे लोकनियुक्त सरपंच पदाचे उमेदवार दादासो धोंडीबा मोरे यांच्या गळ्यात सरपंच पदाची माळ पडली असून पुन्हा सत्ताधारी गटाची सत्ता ग्रामपंचायतीमध्ये आली आहे.
गावात सत्ताधारी व विरोधी गट मिळून इंगळेश्वर ग्रामविकास आघाडी म्हणून रिंगणात उतरली.दोन्ही गटाचे स्थानिक नेते व सर्व कार्यकर्ते यांनी भरपूर मेहनत घेऊन अटीतटीच्या लढतीत सरपंच पदासह १० उमेदवार विजयी करण्याचा खारीचा वाटा उचलून विजय संपादन केले आहे.
या निवडणूकीत विकास कामाच्या जोरावर प्रचार यंत्रणा मोठ्या प्रमाणात राबवून व एकगठ्ठा मतदानाठी प्रर्यत्न केलेने इंगळेश्वर ग्रामविकास आघाडीला मोठ्या प्रमाणावर
निवडणूकीत यश मिळाले आहे.
तसेच इंगळेश्वर परिवर्तन पॅनेलचे ४उमेदवार आणि एका जागेवर राजर्षी छ.शाहू ग्रामविकास आघाडीचे १उमेदवार निवडून येऊन ग्रामपंचायतीमध्ये आपले खाते उघडले आहे.
ग्रामविकास आघाडीचे निवडून आलेले उमेदवार..
लोकनियुक्त सरपंच दादासो धोंडीबा मोरे
प्रभाग एक अमृत शंकर वेताळे.
प्रभाग दोन शिवाजी भुपाल चौगुले, सौ आक्काताई धनपाल बिरांजे (बिनविरोध)
प्रभाग तीन सुरेखा मोहन नाईक,स्वप्नाली सुनिल भातमारे,युवराज तातोबा चव्हाण,
प्रभाग चार मियालाल महमंद पटेल,
प्रभाग पाच जिनेंद्र भालचंद्र ऐतवडे. सुरज अभय बुगटे(बिनविरोध),सिमा निवास मोरे.बिनविरोध)
इंगळेश्वर परिवर्तन पॅनेलचे उमेदवार
प्रभाग एक सौ,सुमय्या जब्बार नायकवडी, सौ मनिषा अनिल भोसले.
प्रभाग चार इरशाद चाॅदसो नायकवडी अश्विनी मगदूम
आणि राजर्षी छ.परिवर्तन आघाडीचे उमेदवार सौ,चंद्रकला दादासो मगदूम यांची वर्णी लागली आहे.
इंगळेश्वर ग्रामविकास आघाडीला यश मिळवून देण्यासाठी आघाडीचे नेते जंबुकुमार देसाई,माजी सरपंच रावसो पाटील, माजी सरपंच बाबूराव पाटील, शांतीनाथ चौगुले,प्रकाश खुडे,डाॅ.आण्णासाहेब पाटील, बाळासो नायकवडी, माजी सरपंच फिरोज नायकवडी, राजू ऐतवडे,शरद कणीरे,श्रीपती येळवडे,विलास मोरे,शामराव मोरे,भरत बुगटे,आणि सर्व कार्यकर्ते यांच्या मेहनतीला यश आले.
त्याचप्रमाणे जब्बार चाॅदसो नायकवडी यांनी आपले कर्तृत्वावर आणि चंद्रकला मगदूम यांनी आपल्या सामाजिक कामावर यश संपादन केले आहे. या सर्व उमेदविरांनी गुलाल व फटाके उडवून आनंद उत्सव साजरा केला.