
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी -श्रीकांत नाथे
अमरावती :-अंजनगाव सुर्जी तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीपैकी दिनांक १८ नोहेंबर २०२२ रोजी झालेल्या सरपंच व सदस्य पदासाठी १३ ग्रामपंचायतीच्या मतदानाची मतमोजणी आज दिनांक २० रोजी अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयातील महसूल विभागाच्या टाऊन हॉलमध्ये निवडणुक निर्णय अधिकारी सुनील सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली मतमोजणी पार पडली.यामध्ये शिवसेना,भाजपा,काँग्रेस पैकी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला सर्वाधिक बहुमत मिळाल्याची बातमी समोर आली आहे.
खोडगाव येथे उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे योगेश देविदास नेमाडे यांनी ५५६ मते घेवून प्रतिस्पर्धी निवृत्ती दादाराव तुरखडे व देवानंद रामभाऊ टेकाडे यांचा पराभव केला असून योगेश देविदास नेमाडे यांच्या पॅनलला १००% बहुमत मिळाले आहे.तर मलकापूर बु.येथे सौ.शोभा सुभाष काळे यांना ४२४ मते घेवून विजयी झाल्या त्यांनी कृ.उ.बा.समितीचे माजी सभापती अरूण खारोळे यांच्या पत्नी सौ.शोभा अरुण खारोडे यांचे सरपंच पदासह सर्व सदस्य उमेदवार पराभूत झाले.मलकापूर ग्रामपंचायतमध्ये रिना दिनेश काळे यांचे पॅनल निवडून आले आहे तर शोभा अरुण खारोडे यांचे पॅनल भूईसपाट झाले आहे.हसनापुर पार्डी येथे अल्का अनंत रोकडे विजयी झाल्या असून शारदा सचिन रोकडे हे पराभूत झाले आहे तर शेलगाव ग्राम पंचायतमध्ये मच्छिंद्र ओंकारराव वाघ यांचा दणदणीत विजयी झाले असून प्रतिस्पर्धी अतुल गणेश मानकर आणि गणेश श्रीराम लेंधे यांचा पराभव झाला आहे.चिंचोली बु.येथील सरपंच पदासाठी सागर श्रीकृष्ण खंडारे हे ८६७ मते घेवून विजयी झाले तर त्यांच्या विरुद्ध उभे असलेले उमेदवार डींपल संजय बाबनेकर यांना ८२९ मते पडली असून त्यांचा पराभव झाला.जवर्डी ग्राम पंचायतमध्ये प्रमोद पंजाबराव ढोक हे ५९९ मते घेवून विजयी झाले असून प्रतिस्पर्धी सौरभ रामभाऊ काळमेघ यांचा १ मतांनी पराभव झाला आहे तर हिरापूर येथून सरपंच पदासाठी कैलास अंबादास बावनथडे ५९६ मतांनी विजयी झाले असून अतुल भोजराज कावरे ४४८ मते घेवून पराभूत झाले.हंतोडा येथून सरपंच पदासाठी पुजा रविकुमार गोळे ६७८ यांचा दणदणीत विजयी झाला असून प्रतिस्पर्धी गायत्री अजय पटेल ५५१ पराभूत झाले.रहीमापुर चिंचोली येथून सरपंच पदासाठी भारती सचीन लांडे ४९१ मतांनी विजयी झाले असून संगीता अविनाश डुकरे हे ३६० आणि रुपाली गजानन मानकर ३१ पराभूत मतांनी पराभूत झाले.खिरगव्हाण ग्रामपंचायत येथील सरपंच पदासाठी सौ.सुजाता दीपक सरदार २५७ विजयी झाले तर सविता संजय खंडारे २०३ पराभूत झालेआहे.तर सोनगाव योगिता अमोल वाकोडे ह्या ३०८ मते घेवून विजयी झाल्या,तर बोराळा स्वाती संजय काळे ह्या ४३८ मते घेवून विजयी झाल्या.हिंगणी येथे सरपंच पदासाठी संदिप प्रकाश लहाने हे ४३० मते घेवून विजयी झाले.
१३ ग्राम पंचायत निवडणुकीत १३ सरपंच व १०३ सदस्य पदासाठी झालेल्या निवडणुकीत विशेष बाब म्हणजे खिरगव्हाण येथील ग्रामपंचायतचे गेल्या दहा वर्षांपासून सरपंच पदी आरूढ असलेल्या तसेच सरपंच सेवा महासंघाचे राज्याध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे यांच्या संपूर्ण पॅनलचा पराभव झाला आहे.त्यांच्या पराभवाची संपूर्ण तालुक्यात चर्चा आहे.सदरची निवडणुकीची निकाल प्रक्रिया तहसीलदार अभिजीत जगताप यांच्या नेतृत्त्वात पार पडली.प्रक्रियेसाठी महसूल विभाग कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.निकाला दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.