
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी -श्रीकांत नाथे
अमरावती :-दर्यापूर तालुक्यातील २४ ग्रामपंचायत करीता दि.१८ डिसेंबर रोजी मतदान शांततेत पार पडले होते.यामध्ये एकूण ८२.५८ टक्के मतदान झाले आणि आज दिनांक २० डिसेंबर रोजी तालुक्यातील २४ ग्रामपंचायतची मतमोजणीला सकाळी १० वाजता पासून नवीन तहसील कार्यालयात सुरुवात झाली होती.
यावेळी परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.नागरिकांसाठी कन्या शाळा परिसरात उभे राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती.या निवडणुकीत सरपंच पद थेट जनतेतून असल्याने निवणुकीला महत्व आले होते.यावेळी निकाल जाहीर होताच गुलाल,निळ यांची उधळत करत व फटाक्याच्या आतिश बाजीने विजयी ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांचे समर्थक जल्लोष करत होते.यावेळी दुपारी २ वाजेपर्यंत संपूर्ण दर्यापूर तालुक्यातील २४ ग्रामपंचायत निवडणूक निकाल जाहीर झाला.यामध्ये अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल समोर आले आहेत.तर कुठे सत्ता कायम तर कुठे परिवर्तन दिसून आले.
सुकळी ग्रामपंचायत सरपंचपदी बबीता सुधीर चक्रनारायण विजयी झाले.तसेच नरसिंगपुर येथून शुभांगी मोहन बायस्कार,गायवाडी येथून विजयराव जामनिक,गोळेगाव येथून शितल प्रविण चव्हाण,महिमापुर येथून सुहास साहेबराव वाटणे,घडा येथून जयकुमार जनार्धन भटकर,नायगाव येथून रोशन ज्ञानेश्वर काळे,पिंपळखुटा येथून अशोक मदन गावंडे,वडुस येथून बाबुराव नितनवरे,हिंगणी येथून विशाल गावंडे,एरंडगाव येथून राहुल शिरीष कावरे,बेलोरा येथून शोभा राजेंद्र धुर्वे,खेरी येथून संजय कोरडे,चंद्रपुर येथून गजबे,चांदोळा येथून भुषण चंचल पाटील जंगले,टाकळी येथून किशोर टाळे,कोळंबी येथून जया नितीन डांगे,माटरगाव येथून तनरूस अन्सार खान,तैलखेडा येथून कांचन सुरेश आढाऊ,जसापुर येथून सविता सुनिल भडांगे,पैठ इतवारपुर येथून जया कोकाटे तसेच सांगवा ग्राम पंचायत सरपंच पदी राजु पाटील कराळे बिनविरोध विजयी झाले आहेत.तसेच सदस्य पदासाठी सुद्धा मोठया प्रमाणावर चुरस निर्माण झाली होती.काही ठिकाणी अतिशय कमी मताने उमेदवार विजयी झाले.
सदर निवडणुक मतमोजणी प्रक्रिया दर्यापूर तालुका निवडणुक अधिकारी तथा तहसिलदार डॉ योगेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शांततेत पार पडली.