दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा –
वझरगा ( दि.21/12/2022) देगलूर तालुक्यातील
वझरगा येथील *तंटामुक्ती उपाध्यक्ष*कै.माधव मारोती सुर्यवंशी* यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यू समयी ते. 50 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुली, दोन मुलं, एक नातू, असा त्यांचा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
