
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:- शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय भूम यांचे मौजे बऱ्हाणपूर येथे दि १९ ते २५ पर्यंत राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरात गावात स्वच्छता अभियान ,जलसंवर्धन, श्रमदान ,राष्ट्रीय एकात्मता ,रस्ते दुरुस्ती ,ग्राम स्वच्छता व जनजागृती ,वृक्षारोपण, बालविवाह प्रतिबंध ,नवमतदान जनजागृती अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
या उद्घाटन समारंभी वि. वि. मंडळ पाथरूड चे अध्यक्ष बोराडे डी. डी.सर , सचिव काटे एम. बी.सर , उपसचिव तथा प्राचार्य संतोष शिंदे,प्राचार्य डॉ. चंदनशिव एस. बी,उत्तम बोराडे सर उपस्थित होते. यावेळी बऱ्हाणपूर उपसरपंच सौ. नेहा पाटील, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. शंकूतला पाटील ,ग्रामसेवक उत्तम गुळवे ,मुख्याध्यापक बाबा पठाण व सहशिक्षक मोटे ,NSS कार्यक्रमाधिकारी प्रा. श्रीमंत पाटील , प्रा. काळे गंगाधर ,सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.तिजारे जी. यु.यांनी केले तर आभार डॉ.रेवडकर जी.एस. यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी महाविद्यालयाचे प्राचार्य शिंदे एस. एस. तसेच कार्यक्रम अधिकारी व प्राध्यापकानीं परिश्रम घेतले.