
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे…
मंठा तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पदाकरीता दोनच उमेदवार रींगणात असल्यामुळे लढत चूरशीची होणार या कारणाने निकालावर सर्व तालुक्यातील जनतेचं लक्ष लागून होत.
त्याचा निकाल तहसील कार्यालय मंठा येथे घोषित करण्यात आला आहे. त्यामध्ये जगदंबा ग्रामविकास पॅनलच्या नायगाव ग्रामपंचायत मधून सरपपंच पदाकरिता चंद्रकला महादेव सूर्यवंशी (491)मते मिळवून निवडून आलेले आहेत, तर नायगाव परिवर्तन ग्रामविकास पॅनलच्या जयश्री श्रावण दाहीजे (368) मत मिळाले यांचा पराभव झाला . निवडणूक ऐकण्याकरिता मंठा तहसील कार्यालय व रेणुका देवी मंदिर परिसरात चारही बाजूला खूप गर्दी करण्यात आली होती कार्यकर्त्यांनी निवडून आलेले उमेदवाराचे जल्लोषाने स्वागत केले. मिरवणूक काढण्यात
आलेली आहे. निवडणूक शांततेत पार पडली.तहसील ऑफिसच्या चारही बाजूला पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आणि तहसीलच्या चारही बाजूला लोकांची खूपच गर्दी केली होतीं.