
दैनिक चालू वार्ता म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद कोकण विभाग व आखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ संलग्न यांच्या कडून श्री झाकीर हुसेन हलसंगी यांना गुणवंत कर्तृत्वान शिक्षक 2022-23 चा पुरस्कार मा. ना गो गाणार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या कार्यक्रमाला श्री रवींद्र इनामदार कोकण विभाग अध्यक्ष, शशिकांत चौधरी कोकण विभाग कार्यध्यक्ष,वेणू कडू प्रांताध्यक्ष, लक्षमण वालगुंडे जिल्हाध्यक्ष,श्री अनिल पाटील जिल्हा कार्यध्यक्ष इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानीत करण्यात आला श्री झाकीर हुसेन हलसंगी सर हे एक विद्यार्थी प्रिय शिक्षक गजलकार, शायर, उर्दू भाषेंवसर प्रचंड असे प्रभुत्व असलेले व्यक्तीमत्व, एक उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक म्हणून म्हसळा तालुक्यात परिचीत असून मौलाना अबूल कलाम आजाद पांगळोली या शाळेत सह्य- शिक्षक म्हणून कार्यरत असून त्यांच्या या कार्याच्या पोचपावतीला सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येते आहे यांचे औचित्य साधून म्हसळा तालुका क्रीडा समितीच्या वतीने मा श्री झाकीर हुसेन हलसंगी यांच्या सत्कार करण्यात आला क्रीडा शिक्षक, मा. मोरे सर एन इ एस. म्हसळा, श्री देवराम डावखर श्री प्रफुल पाटील श्री रईस शेख, श्री नितीन पाटील हे उपस्थित होते.