
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा –
पुणे दि. धर्म रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर पुणे जिल्ह्यातील वढू बुद्रुक येथे सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करणारे आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या अत्यंत जवळचे विश्वासू समजले जाणारे नाशिक येथील शेमशेज किल्ल्याचे किल्लेदार असलेले पुणे जिल्ह्यातील वढू बुद्रुक येथील वीर योद्धा गोविंदा गायकवाड यांचे वडू बुद्रुक येथील गोविंद गोपाल गायकवाड राष्ट्रीय स्मारकाच्या बांधकामासाठी निधी मिळावा म्हणून या मागणीसाठी बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी दि १९.९.२०२२. रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले होते
गेल्या तीन महिन्याच्या कालविधीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांच्या निवेदनाची दखल घेऊन मुख्यमंत्री कार्यालयातील सचिव नितीन दळवी यांना आदेश देऊन वीर योद्धा गोविंद गोपाल गायकवाड यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या बांधकाम निधी संदर्भात संबंधित अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते असे बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी सांगितले
मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव नितीन दळवी सामाजिक न्याय विशेष सहाय्य सचिव बालाजी खातगावकर व सार्वजनिक बांधकाम विभाग सहायता सचिव मिश्रा या वरिष्ठ अधिकारी यांच्याशी सोमवार दि.१९/१२/२०२२ रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी वीर योद्धा गोविंद गोपाल गायकवाड यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या बांधकामाच्या निधी संदर्भात अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून माहिती घेतली असताना वीर योद्धा गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या बांधकाम निधीचा प्रस्ताव अहवाल तयार करून बहुजन जनता दलाचे पदाधिकारी आणि संबंधित अधिकारी यांची संयुक्त समिती तयार करण्यात येणार असल्याची माहिती मंत्रालयातील संबंधित अधिकारी यांनी बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांना माहिती दिली असे बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकार ही माहिती दिली.