
दैनिक चालू वार्ता म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
म्हसळा – नुकत्याच पार पडलेल्या तालुका आणि जिल्हा स्तरावर योगासने या क्रिडा प्रकारात म्हसळा तालुक्यातील नावाजलेले क्रीडा क्षेत्रातील नाव खरसई गावातील विद्यार्थ्यांनीने जिल्हा स्तरावर चमकदार कामगिरी केली आहे.
यामध्ये १४ वर्षांखालील योगासने गटात दिशा लक्ष्मण मेंदाडकर , उज्वला किशोर खोत, पुजा जर्नादन खोत, लावण्या प्रकाश शितकर, सारा जनार्दन खोत, भुमी गोवर्धन म्हसकर रा.जि.प.खरसई मराठी शाळेचे विद्यार्थी तसेच जिविका गणेश मांदाडकर आय.डी. एल.स्कूल म्हसळा, आणि १७ वर्षांखालील मुली गटात मानसी योगेश मांदाडकर, मनस्वी बाळकृष्ण मांदारे , सिध्दी दत्ताराम पयेर, भार्गवी लक्ष्मण माळी, मुले- भाविक नामदेव खोत, सुरज मंगेश पाटिल न्यु इंग्लिश स्कुल खरसई, चे विद्यार्थ्यांनी जिल्हा स्तरावर नुकत्याच पार पडलेल्या योगासने क्रीडा प्रकारात घवघवीत यश प्राप्त केले आहे. या यशाबद्दल खरसई गावांसह म्हसळा तालुक्याच्या कानाकोपऱ्यात कौतुकाचा वर्षाव होत आहे. पुढील आठवड्यात हे खेळाडू मुंबई शहरात विभागीय स्तरावर योगासने क्रीडा प्रकारात सहभागी होणार आहेत. जिद्द चिकाटी, सराव आणि आत्मविश्वास याच्या जोरावर विद्यार्थी नाविन्यपूर्ण क्रीडा उपक्रमात सहभागी होत आहे. योगासने क्रिडा मुख्य मार्गदर्शक श्री. उत्तम मांदारे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून या विद्यार्थ्यांमध्ये चांगली गती निर्माण केली आहे. तसेच योगा प्रकारात सातत्य ठेऊन विद्यार्थ्यांना चांगले कौशल्य विकसित केले आहे.
यावेळी शाळेच्या माध्यमातून न्यु इंग्लिश स्कूल चे क्रीडा शिक्षक श्री नितीन पाटील सर, रा जि प शाळा खरसई चे क्रीडा शिक्षक श्री बालाजी राठोड सर यांनी . शाळा स्तरावरचे योग्य पध्दतीने खेळाचे योग्य व्यवस्थापन केले. तसेच
आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी क्रिडा क्षेत्रात केलेले खरसई गावचे सुपुत्र हेमंतजी पयेर यांनी ही वेळोवेळी मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये खरसई गावचा, शाळेचा क्रिडा क्षेत्रातील आलेख उंचावताना दिसत आहे. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा माजी सरपंच निलेश मांदाडकर, विनय शिक्षण संस्था महाड (लोणेरे) कार्यवाह नानासाहेब सावंत, स्थानिक स्कुल कमेटी पदाधिकारी पी.आर. मांदाडकर, तुकाराम मांदाडकर, भालचंद्र म्हसकर, शाळा व्यवस्थापन स्कुल दत्ताराम पयेर, आणि कमेटी पदाधिकारी,सोमजाई माता मंडळाचे संस्थापक चंद्रकांत खोत यांनी पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक मुलांणी सर, सातपुते सर, भोसले मॅडम, आंबेडकर सर, प्राथमिक शाळेचे शिक्षक सानप सर, मडावी सर, कोळसे मॅडम,शेंबाळे सर, बेटकर सर यांनी अथक परिश्रम घेतले, शाळा व्यवस्थापन समितीचे प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा खरसई चे यावेळी मोलाचे सहकार्य लाभले.शैक्षणिक वर्ष २०२२-२३ या वर्षात रा.जि.प.शाळा खरसई मराठी व हायस्कूल येथील आमच्या शाळेतील व गावातील विद्यार्थ्यांनी खुप सुंदर कामगिरी तालुका स्तरावर करून विद्यार्थ्यांनी स्वतः चे व शाळेचे आणि गावाचे रोशन केले आहे. त्याबद्दल मी शाळेचे शिक्षक प्राथमिक, माध्यमिक वृंद व क्रीडा शिक्षक यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. त्याच प्रमाणे जिल्हा स्तरावर व विभाग स्तरावर निवड झाल्याबद्दल नक्कीच विद्यार्थी पुढील नेतृत्व पार पाडतील.
श्री. निलेश मांदाडकर – अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती खरसई मराठीकेंद्र – वरवठणे या केंद्रातील रा.जि. प. आदर्श शाळा खरसई मराठी व न्यू इंग्लिश स्कुल खरसई या शाळेतील विद्यार्थ्यांनी चालू शैक्षणिक वर्षात वैयक्तिक खेळ, कबड्डी सांघिक खेळ जिल्हा स्तरावर, तसेच योगासने खेळात जिल्हा स्तरावर नेत्रदीपक कामगिरी केली आहे. सध्या मुंबई येथे होणारया विभागीय स्पर्धेत खरसई शाळेतील सुंदररित्या कामगिरी करतील अशा विद्यार्थी आणि शिक्षक यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
केंद्र – वरवठणे या केंद्रातील रा.जि. प. आदर्श शाळा खरसई मराठी व न्यू इंग्लिश स्कुल खरसई या शाळेतील विद्यार्थ्यांनी चालू शैक्षणिक वर्षात वैयक्तिक खेळ, कबड्डी सांघिक खेळ जिल्हा स्तरावर, तसेच योगासने खेळात जिल्हा स्तरावर नेत्रदीपक कामगिरी केली आहे. सध्या मुंबई येथे होणारया विभागीय स्पर्धेत खरसई शाळेतील सुंदररित्या कामगिरी करतील अशा विद्यार्थी आणि शिक्षक यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाकेंद्र – वरवठणे या केंद्रातील रा.जि. प. आदर्श शाळा खरसई मराठी व न्यू इंग्लिश स्कुल खरसई या शाळेतील विद्यार्थ्यांनी चालू शैक्षणिक वर्षात वैयक्तिक खेळ, कबड्डी सांघिक खेळ जिल्हा स्तरावर, तसेच योगासने खेळात जिल्हा स्तरावर नेत्रदीपक कामगिरी केली आहे. सध्या मुंबई येथे होणारया विभागीय स्पर्धेत खरसई शाळेतील सुंदररित्या कामगिरी करतील अशा विद्यार्थी आणि शिक्षक यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
केंद्र प्रमुख – किरण पाटील सर
केंद्र प्रमुख – वरवठणे ता म्हसळा यांनी ही विद्यार्थी आणि शिक्षक यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा मा गटशिक्षण अधिकारी मा. संतोष दौड साहेब यांनी ही विद्यार्थी आणि शिक्षक यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.खरसई शाळेच्या विद्यार्थ्यांनी म्हसळा तालुक्याच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवला आहे. त्यांना विभागीय स्पर्धेसाठी विजयी भव….!!!