
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
नागपूर :- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार गिरीशजी महाजन साहेब यांनी आमदार श्री.तुषारभाऊ राठोड साहेब यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येवर आमदार डॉक्टर तुषार राठोड यांच्या उपस्थितीत या परिक्षा पॅडचे अनावरण केले आहे.
आमदार डॉक्टर तुषार राठोड यांच्या ४४ व्या वाढदिवसानिमित्त दिनांक 23 डिसेंबर रोजी मुखेड-कंधार विधानसभा मतदारसंघातील इयत्ता आठवी ते इयत्ता बारावी मध्ये शिक्षण घेणाऱ्या २६ हजार विद्यार्थ्यांना परीक्षा पॅडचे वाटप भारतीय जनता पार्टी मुखेड च्या वतीने करण्यात येणार आहे.अशी माहिती पेठवडज सर्कल शक्ती केंद्र प्रमुख श्री.व्यंकट पाटील कळकेकर यांनी दिली आहे.