
दैनिक चालू वार्ता हातकणंगले प्रतिनीधी –
बलवडी(भा)ता.खानापूर.जिल्हा सांगली येथील जोतिर्लिंग साहित्य सेवा मंडळ यांच्या वतीने देणेत येणाऱ्या ३० व्या मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात !! संमेलन कार्यकर्ता. !!हा पुरस्कार जाहीर झाला असून सदरचा पुरस्कार २५ डिंसेंबर २०२२रोजी देणेत येणार आहे.
त्याच बरोबर शाहीर बजरंग आंबी यांना शाहीर बाळकृष्ण कुलकर्णी यांचे नावे जोतिर्लिंग साहित्य सेवा पुरस्कार,डाॅ.एच.के.पवार यांचे नावे मानसिंग जाधव यांना कृषि सेवा प्रगतशील शेतकरी पुरस्कार,तसेच श्रीमती इंदूमती आंनंदराव पवार यांचे नावे सौ,शारदा नानासो सांळुखे यांना आदर्श माता पुरस्कार, व मारूती मल्लू जाधव (आबा गुरूजी)यांचे नांवे ऋषीकेश तांबडे सर यांना आदर्श प्रा.शिक्षक पुरस्कार, व भि.रा.पवार यांचे नांवे आर्दश माध्य.शिक्षक पुरस्कार सिंकदर मोमीण भाळवणी यांना,आणि विषेश सन्मान सदानंद कदम सांगली,रमजान मुल्ला नागठाणे यांचा करणेत येणार आहे. संमेलन उद्घाटन डाॅ.बाबासाहेब देशमुख हे असून संमेलन अध्यक्ष साहित्यक विजय चोरमारे हे भूषवणार आहेत.स्वागताध्यक्ष विठ्ठल सांळुखे हे करणार आहेत.तर प्रमुख पाहुणे म्हणून कांदंबरीकार डाॅ.श्रीकांत पाटील घुणकी हे आहेत.तसेच परिसंवादामध्ये डाॅ.सुभाष वाघमारे, आणि सहभाग वक्ते विजय मांडके आहेत.कथाकथन जयवंत आवटे यांचे असून इंद्रजीत घुले हे कवि संमेलनाचे अध्यक्ष आहेत.सदरचा कार्यक्रम सिद्धनाथ मंदीर सभामंडपात बलवडी(भा)येथे संपन्न होणार आहे. अशी माहिती कथाकथनकार प्रा.शांतीनाथ मांगले सर यांनी प्रसिद्धिस दिली आहे.