
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे…
मंठा तालुक्यातील क्षेत्र कोरडवाहू असल्यामुळे काही शेतकरी सोयाबीन आणि त्यात तुरीचे पाटे घालतात आता तुरीचे पीक काढणीस सुरुवात झाली.
सातत्याने तीन वर्षांपासून शेतातील उत्पादन व खर्चाचा ताळमेळ बसत नाही. पूर, महापूर, अतिवृष्टी, कीड व रोगांचा प्रकोप शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजल्यासारखा आहे. त्यामुळे शेतातील उत्पादनात सातत्याने होत असलेली घट व वाढलेला उत्पादन खर्च यावर पर्याय म्हणून यंदा तालुक्यातील गहू तूर उत्पादक शेतकरी हार्वेस्टरकडे वळले. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी स्वायाबीन कापणीपासून मळणी हार्वेस्टरने केली आहेत. परिणामी वेळ व खर्चाची बचत झाल्याची शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
दरवर्षी ना काही कारणाने शेतीत तोटा सहन करावा लागतो आहे. तरीही दरवर्षी भरघोस पीक होण्याच्या आशेने शेतात परिश्रम करण्याचे काम शेतकरी जोमाने करीत असतो. यातच मजुरांचा तुटवडा, खंडित विद्युत पुरवठा, किडीचे संकट, जंगली श्वापदांची भिती, भारनियमन या सगळ्या चा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. महागाईने लागवडीचा
खर्च सातत्याने वाढत आहे. परंतु उत्पादन फारसे वाढत नसल्याने करावे तरी काय, असा प्रश्न निर्माण होतो. शेतकरी खर्चात बचत करण्याचा अनेक प्रयत्न करतो. स्वत: राबतो; परंतु अपेक्षित यश अद्यापही येताना दिसत नाही. यामुळे श्रम, पैसा व वेळेची बचत करण्याचे पर्याय म्हणून आता यांत्रिकी शेतीकडे शेतकरी वळले आहेत. अलीकडे तूर कापणी व मळणी आदी कार्य एकदाच करणारे हार्वेस्टर उपलब्ध होत असल्याने तो पर्याय निवडीकडे कल वाढताना दिसून येत आहे. यंदा एकरी दोन ते अडीच हजार रुपयांची व्यवस्था म्हणून शेतकरी हार्वेस्टरचा वापर मोठ्या प्रमाणात करीत आहे.