
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- परतवाडा तहसील आणि आसपास च्या परिसरात सध्या सागवान तस्करीमुळे बाजारपेठ चांगलीच तापली आहे.यासोबतच या परिसरात अवैध धंदेही झपाट्याने वाढत आहेत.मध्यप्रदेश महाराष्ट्र वनविभागाच्या संयुक्त कारवाईत परतवाडा येथे कारवाई करण्यात आली.पाठलाग करताना परतवाडा वनविभागाच्या मदतीने कारवाई करण्यात आली.मात्र,सागवान वाहतूक करणारा ट्रक उलटल्याने प्रकरण समोर आले आहे.तीच कृती दाखवली आहे.मात्र चांदूरबाजार तालुक्याला लागून असलेल्या मध्यप्रदेश सीमाभागातून मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे.यामध्ये सागवान तस्करी आघाडीवर आहे.प्रभाग क्रमांक १ आणि ब्राम्हणवाडा नवीन भूखंड,शिरसगाव व करजगाव हे तस्करीचे अड्डे मानले जाते.त्यात ५० जणांची टोळी सक्रिय आहे.याबाबत वनविभागाला पूर्ण माहिती देऊनही कारवाई होताना दिसत नाही.शिरजगाव पोलीस ठाणे व ब्राम्हणवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक तस्करी होत आहे.दुसरीकडे शिरजगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या करजगाव-शिरजगाव येथे रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहनातून खुलेआम तस्करी केली जात आहे.रात्रीच्या वेळी येथे सागाचे मोठे खोडे रिकामे केले जात आहेत.
करजगाव येथून काही सागवान अमरावतीलाही नेले जाते.ब्राह्मणवाडा ते हैदराबादला सागवान येथील निवडक व्यापाऱ्यांना विकले जाते.स्थानिक मागणी असूनही,हैदराबाद बाजार कमी किंमतीमुळे फायदेशीर असल्याचे सिद्ध होते.ब्राह्मवाड्यातील संत्री किंवा केळी कॅरेटच्या खाली सागवान दाबून तस्करी केली जातात.करजगाव,शिरजगाव,ब्राम्हणवाडा या गावात १३ फिनिशिंग मशिन असून अजूनही २० ते २५ तस्कर सक्रिय असल्याची चर्चा आहे.