
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती:-अकोट मार्गावर अंजनगाव सुर्जी नगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापन केंद्र आहे.एकीकडे शासन स्वच्छ भारत अभियान राबवित असताना नगरपालिका अंजनगाव सुर्जी त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.घनकचरा व्यवस्थापन प्लांट वरील कचरा आणि मृत जनावरे नेहमीचच रोडवर येत असल्याने अपघात होण्याची शक्यता टाळता येत नाही.याअगोदर सुद्धा त्या ठिकाणी अपघात झाल्यामुळे त्या रोडवरील येजा करणाऱ्या नागरिकांच्या सोबत नगरपालिका आरोग्याशी खेळत तर नाही ना? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.सध्यापरिस्थितीत रोडवरील कचरा हटविला असला तरी असेल तरी वारंवार असे होत असल्याकारणाने अंजनगाव सुर्जी नगरपालिका घनकचरा व्यवस्थापन अतिशय मानवी आरोग्यास घातक ठरणारा दिसत असल्याचे सुद्धा नागरिकांचे म्हणणे आहे.अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेने निर्माण केलेल्या घनकचरा व्यवस्थापन केंद्रावरील कचरा वारंवार रोडवर येतो व त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो असे नागरिकांचे म्हणणे आहे.