
दैनिक चालू वार्ता परभणी उपसंपादक – दत्तात्रय वामनराव कराळे
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
परभणी/नांदेड :
अल्पावधीतच जनमानसांचा आरसा बनला गेलेल्या “चालू वार्ता” या मराठी दैनिकाने कांही दिवसांपूर्वीच वर्धापन दिन साजरा केला. त्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथराव शिंदे, माजी अर्थमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते मा. ना. श्री. अजित दादा पवार यांच्यासह अनेक नामदार, खासदार, आमदार आणि लाखोंच्या संख्येतील वाचक महोदयांनी चालू वार्ता या दैनिकाचं तोंड भरुन कौतुक तर केले आहेच शिवाय भावी वाटचालीसाठी भरभरुन शुभेच्छा सुध्दा दिल्या आहेत. ही बाब निश्चितच आमच्यासाठी भूषणावह आहे. विविध मान्यवर आणि थोरा-मोठ्यांच्या आशीर्वादाची शिदोरी गाठोड्याच्या रुपात आम्ही सदैव जवळ बाळगणार आहोत. न फिटणारे ऋण समजून आम्ही त्यांच्याच आशीर्वादाने मोठी झेप घेऊ इच्छित आहोत. कारण त्यामुळे चालू वार्ता परिवाराचा हुरुप निश्चितच वाढला जाऊन मोठी उर्जा मिळणार आहे.
त्या निमित्ताने नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे सर्व पत्रकार-प्रतिनिधींचा “वार्षिक स्नेह मेळावा” आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात आमच्या वृत्तपत्राचे व चॅनेलचे मुख्य संस्थापक-संपादक मा. श्री. डी. एस्.लोखंडे साहेब आणि निमंत्रित मान्यवर हे वृत्तपत्राच्या प्रगतीसाठी बहुमूल्य असे मार्गदर्शन करणार आहेत. याच मेळाव्यात चालू वार्ता माध्यमाच्या भविष्य काळातील घडामोडींबद्दल चर्चासत्र ठेवण्यात आले आहे. एवढेंच नाही तर चालू वार्ता हे मराठी दैनिक महाराष्ट्रात ब्रॅण्ड पेपर कसे करता येईल, यावर भरीव अशी चर्चा होणार आहे.
याच औचित्यावर ज्या ज्या पत्रकार बांधवांनी चालू वार्ताच्या उन्नतीसाठी मागील काळात उत्कृष्ट कार्य केले आहे, त्यांचा सन्मान पत्र देऊन यथोचित गौरव केला जाणार आहे.
नांदेड जिल्ह्यातील चालू वार्ता माध्यमांचे सर्व प्रतिनिधी व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांनी विनम्रपणे केले आहे. तरी रविवार, दि. २५/१२/२०२२ रोजी सकाळी ठिक ११ वाजता लातूर रोडवरील “जिजाऊ ज्ञान मंदीर इंग्लिश स्कूल मुखेड येथे वेळेआधीच आवर्जून उपस्थित राहावे, यासाठीचे जाहीर आवाहन केले आहे.