
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी अहमदपुर-विष्णू पोले
दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये वेळ अमावस्या, मराठी ग्रामीण भाषेत येळवस हा मूळ कर्नाटकी असणारा पण महाराष्ट्रात उस्मानाबाद, लातूर,आणी परळीचा उर्वरित भाग येथे हा उत्सव मार्गशीर्ष अमावस्येला ,पेरणीनंतर येणाऱ्या सातव्या अमावश्याला हा कृषी प्रधान उत्सव साजरा केला जातो.
शेतकरी सकाळी स्नान करून देवदैवतांच दर्शन करून आपल्या सर्व कुटुंबा सह आपल्या शेताकडे जातात.शेतात गेल्यानंतर पांडवान्च पूजन,लक्ष्मी मातेच पूजन केल जात त्यांना नैवेध अर्पण केला जातो.परंपरेनुसार कडब्याची कोप(खोपी) करून त्यावर शाल बांधली जाते हवा,अन्न आणी पाणी यांना नमन करून हे निसर्गा आम्ही तुझ्या श्रष्टीचे भागीदार आहोत हे दाखवलं जात आणी वंदन करून आभार मानले जातात.
वेळ अमावशेनिमित्त अनेक प्रकारचे पकवान केले जातात,त्यामध्ये भजी, बाजरीची भाकर,आंबील,वांग्याचे भरीत,दही अशा प्रकारचे पकवान बनवून “व्होलग्या वोहलग्या ,पालन सलग्या” म्हणून आपल्या खोपीवरती आंबील शिपडून,पूजा संपन्न केली जाते.
नंतर पूर्ण कुटुंब बसून स्नेह भोजन केल जात.त्या दिवशी आपले मित्र,स्नेही,नातलग यांना पण आपल्या शेतात भोजनाचा आग्रह केला जातो.आपल्या शेजारी पाजारी यांना पण बोलवलं जात.बाहेर गावी असलेले,नोकरदार,व्यापारी,तसेच विधार्थी आवर्जून आपल्या गावी येऊन आपल्या शेतात आपल्या मित्र,कुटुंबिया सह भोजन करून व गप्पा मारून वेगळाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो.
ग्रामीण भागात वेळ अमावस्या हा आर्थिक देवान घेवाणीचा पण एक भाग आहे या महिन्यात सर्व शेतकऱ्याची थोडी बहुत तरी रास झालेली असते.त्यामुळे या महिन्यात शेतकऱ्यांच आर्थिक चक्र चालू होत.
अशा प्रकारे सर्व शेतकरी कुटुंब,मित्र,गाव,आणी शेती निसर्ग यांना जवळ आणणाऱ्या आणी सर्वांच्या आयुष्यात आणणाऱ्या या कृषी प्रधान सणाला अनन्य साधारण महत्व आहे.