
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी- राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर:- नुकतेच ता.अहमदपूर जि. लातूर येथे पार पडलेल्या १६ डिसेंबर रोजी हँडबॉल विभागीय स्पर्धेत प्रथम (वयोगट १४ वयोगट १९) विजेतेपद पटकावले तर १७ वयोगटातील संघाने द्वितीय क्रमांक पटकविला १४ वर्षेखालील व १९ वर्षेखालील दोन्ही संघाची राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. या खेळाडूंची निवडीबद्धल महात्मा फुले महाविद्यालयाचे संस्थाचालक , मुख्याध्यापक ,क्रीडा शिक्षक व आदींच्या वतीने खेळाडू विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या तसेच क्रीडा शिक्षक सुनिल सुरकुटे व बी, एम पाटिल सर यांनी आपल्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे या निवड झालेल्या विभागीय हँडबॉल स्पर्धेमध्ये श्रेयश गित्ते , करण पवार, अर्जुन पवार ,गजानन रगडगेवाड , सुनील केंद्रे , जयेश सुर्यवंशी , कार्तिक केंद्रे , कुणाल श्रीमंगले , सदानंद गुट्टे , आदित्य पलमट्टे , पवन नरवटे , आदी खेळाडूंचा समावेश होता