
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -प्रदिप मडावी
चंद्रपूर
आम आदमी पार्टी, बल्लारपूर शहर संयोजक रविकुमार पुप्पलवार जी आणि निवडणूक प्रभारी प्रा. नागेश्वर गंडलेवार जी यांच्या मार्गदर्शनाखाली व महिला उपाध्यक्षा सलमा सिद्दीकी जी यांच्या नेतृत्वाखाली बुधवार दिनांक:- 21/12/2022 रोजी आम आदमी पार्टी बल्लारपूर यांनी नगर परिषद व MJP ला नळ व बोअरिंग च्या विविध पाण्याच्या समस्यांची माहिती दिली , काही दिवसांपासून सुभाष वार्डात अजिबात नळ येत नव्हते आणि एक वर्षापासून बोरिंग बंद होते, त्याचे सर्व्हेक्षण कोषाध्यक्ष आसिफ शेख, सचिव ज्योतीताई बाबरे, युथ अध्यक्ष सागर कांबळे, सलमा सिद्दीकी, गगन साकीनाला, वार्डातील पूर्ण माहिती घेऊन, बोअरिंगमध्ये लवकरात लवकर हँडपंप बसवून नळांची समस्या सोडवावी व जनतेला पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे निवेदन नगर परिषद व MJP ला देण्यात आले.