
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -प्रदिप मडावी
जिवती
जिवती तालुक्यातील अतिशय महत्वाचा मुद्दा,दि.२१.१२.२०२२ रोजी हरिसिंग वनसभागृह सेमिनरी हिल्स, नागपूर येथे ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार मंत्री वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री चंद्रपूर यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुका वन क्षेत्रातून वागळण्या संबंधी बैठक संपन्न झाली सदर बैठकीत भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी आमदार संजय धोटे, जिवती तालुकाध्यक्ष केशवजी गिरमा, पं.स. माजी उपसभापती महेश देवकते यांनी उपस्थित राहून संपूर्ण तलुकाच वन क्षेत्र घोषित केल्यामुळे संपूर्ण विकास थांबल्या बाबत समस्या मांडल्या. प्रथम ११ गावातील वनखंडात समाविष्ट नसलेली ८१९५ हेक्टर जमीन वनक्षेत्रातून वगळन्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनबल प्रमुख वाय. एल.पी. राव, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री, चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा, उपविभागीय अधिकारी राजुरा संपत खलाटे व संबंधीत सर्व अधिकारी उपस्थित होते.