
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -सिद्धार्थ तायडे
खामगाव येथील विश्रामगृहावर भूमिमुक्ती मोर्चा तथा विविध सामाजिक पक्ष संघटनाच्या वतीने भाई भाऊराव सरदार यांचा ५८ व्या वाढदिवसानिमित्त निमित्त अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता बुलढाणा जिल्ह्यातील माटरगांव जलंब परिसरात प्रत्येक तरुणाला परिचित भाई बाबुराव सरदार ही व्यक्तिमत्व तरुणांना नव्हे तर वयोवृद्धांना सुद्धा प्रबोधनाच्या माध्यमातून जागृत करणारे आहे.त्यांचे भारतीय संविधानावरील मार्गदर्शन ऐकल्यानंतर आपण अन्याय का बरं सहन करत आहोत? आपल्याला तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मोठे संरक्षण कवच दिले आहे .याची जाणीव भाई बाबुराव सरदार यांच्या मार्गदर्शनातून होत असते भारतीय संविधानाचे अभ्यासक म्हणून आज ते सुपरिचित आहेत त्यांचे भारतीय संविधानावर अनेक व्याख्यान बुलढाणा जिल्ह्यात व इतर जिल्ह्यात सुद्धा झाले आहेत. व्यक्ती किंवा समाज यांच्या जीवनाला एक नवी दिशा देणारी अभिप्रेरणा त्यांच्या व्याख्यानातून मिळत असते अभ्यासू चिकित्सक व्यक्तिमत्त्वाचे धनी भाई बाबुराव सरदार वेळप्रसंगी आक्रमक सुद्धा असतात समाज बांधवांवर जर अन्याय होत असेल तर आपल्या मार्गदर्शनातून जागृती चा मंत्र निश्चित समाज बांधवांना देऊन अन्याय सहन करणारा हाच खरा गुन्हेगार असतो हे अगदी निर्भीडपणे आपले मत मांडताना मी पाहीले आहे. जिल्ह्यात विविध आंदोलने त्यांनी केलेली आहेत प्रामुख्याने नामांतर लढा वन जमीन अतिक्रमण धारक भूमिहीन गोरगरिबांचा लढा यामध्ये अतुलनीय संघर्ष भाई बाबुराव सरदार यांनी केला आहे. समाजाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे पाठीवर शाबासकीचा हात ठेवणारे प्रत्येक चांगल्या कामात आमच्या प्रती विश्वास दाखवणारे भाई बाबुराव सरदार वामनदादा कर्डक यांच्या शब्दात सांगावयाचे झाल्यास तुफानातील दिवे आम्ही तुफानातील दिवे अशा या तुफानातील दिव्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे हितचिंतक मित्रमंडळी चळवळतील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात एकत्रित आले होते . अनेकांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुभाष सुरवाडे नाईक ,काँग्रेस सेवा दलाच्या वतीने अमित तायडे, दैनिक प्रखर तेजचे संपादक किरण मोरे ,भीमशक्तीचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण मोरे ,विजय बोदडे, प्रकाश दांडगे ,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रसेंजित तायडे यांनी आपल्या भाषणामधून भाई भाऊराव सरदार यांच्या विषयी गौरव उद्गार काढून वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या.