
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी सांगली- संभाजी गोसावी
सध्या महारांष्ट्रभर धुमाकूळ घातली सुप्रसिद्ध लावणी डान्सर गौतमी पाटील अखेर अडचणीत आल्या आहेत. तिच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य विकास सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष प्रशांत लक्ष्मण सदामते यांनी थेट सांगली जिल्हाधिकारी केली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीवरुन लावणी डान्सर गौतमी पाटील आणि तिच्या कार्यक्रमांला होणारे गर्दी यामुळे अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली डान्सर गौतमी पाटील हिच्या अश्लिल डान्स मुळे महाराष्ट्रांत तिच्या कार्यक्रमांवरुन कायमस्वरुपी बंदी घालण्यांत यावी. मिरज तालुक्यांतील बेडग येथील दत्तात्रेय ओमसे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या गौतमी पाटीलवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यांत यावा अशी मागणी करण्यात आली आहे. गौतमी पाटील महाराष्ट्रांतील लावणी परंपरेला व संस्कृतीला छेद देत आहे. सार्वजनिक ठिकाणी असशि डान्स सादर करीत असते. तिचे असशील हावभावांचे व्हिडिओ घराघरात पोहोचत आहेत.मुले-मुली यांच्यासमोर असे व्हिडिओ नजर-चुकीने समोर येतात. गेल्या महिन्यांत मिरज तालुक्यांतील बेडग येथे कार्यक्रमानिमिंत्त गौतमी पाटलांचा लावणी कार्यक्रम पाहण्यासाठी हजारो लोक शाळेच्या छतावर झाडावर बसलेले होते. कार्यक्रमादरम्यान गर्दीचा धिंगाणा देखील सुरु होता. यावेळी दत्तात्रेय ओमसे यांचा मृतदेह त्या ठिकाणी आढळला. मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यांत या घटनेचे आकस्मिंक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. परंतु या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी. आणि दत्तात्रयच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या गौतमी पाटीलवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच सार्वजनिक ठिकाणी असशील वर्तन करुन डान्स केल्यांने तिच्या प्रत्येक कार्यक्रमांत गोंधळ होत आहे. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नं निर्माण होतो. त्यामुळे गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमावर महाराष्ट्रात बंदी घालण्यांत यावी अशी मागणी आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे महाराष्ट्र राज्य विकास सेनेचे युवक प्रदेशाध्यक्ष प्रशांत लक्ष्मण सदामते यांनी केली आहे.