
दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधी -विशाल खुणे
(दि 22 डिसें किरकिटवाडी पुणे )
फ्युचर्स ब्राईट स्कूल संस्थापक अध्यक्ष शेखर हगवणे, मुख्याध्यापिका अश्विनी कुलकर्णी यांनी आयोजन केले. कार्यक्रमात किरकिटवाडी मनसे अध्यक्ष संतोष रिंधे यांनी उपस्थिती दर्शविली त्यामध्ये बोलताना रिंधे म्हणाले की “फ्यूचर ब्राईट स्कूल मधील विद्यार्थी यांनीं सादर केलेले भाषण, गीते आणी नृत्य यातून जो सर्व धर्म समभाव हा एक मौलिक देशभक्तीपर विचारांची जनजागृती केली हे कार्यक्रमाचे विशेष आहे आणी ही शाळा हा संस्कार विद्यार्थ्यांवर पेरत आहे याचा सार्थ अभिमान वाटतो” असे म्हणुन त्यांनी विद्यार्थी, शिक्षक आणी शाळेचे कौतुक केले.
कार्यक्रमाला उपस्थितीत मान्यवरा मध्ये कामगार नेते कालिदास माने , मा.उपसरपंच काजल हगवणे, नरेंद्र हगवणे, सारिका सोनवणे, संतोष रिंढे (मनसे शाखा अध्यक्ष किरकिटवाडी ) बाबासाहेब ढाकणे, सुनील हगवणे, संदिप हगवणे, सुरज हगवणे, रमेश करंजावणे हे उपस्थित होते.
उपस्थित पाहुण्यांचे स्वागत शिक्षिका गितांजली इनामदार यांनी केले तर मोहिनी माने यांनीसर्व पाहुण्यांचे व पालक वर्ग प्रेक्षकांचे उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.