
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर,:देगलूर व देगलूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये वेळ अमावस्या खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते त्यावेळी सकाळी लवकर उठून आंबील व विविध प्रकारचे जेवण हे शेतात घेऊन शेतात पूजा वगैरे करून मित्रमंडळी व पाहुण्यांना शेतामध्ये बोलून जेवण दिले जाते मार्गशिर्ष अमावस्येला सोलापुर जिल्ह्याचा काही भाग, लातुर व उस्मानाबाद जिल्ह्यात “वेळा अमावस्या” हा शेतकरी बांधवांचा महत्वाचा सण साजरा केला जातो. हा सण शेजारील
कर्नाटकातुन महाराष्ट्रात आला आहे. गेल्या १६ डिसेंबर रोजी हा सण मोठ्या उत्साहात पार पडला.
ह्या दरम्यान रब्बीचे पिक जोरात असते, शेतकरी बांधव ह्या दिवशी कुटुंबासहीत, मित्रपरीवारासह
शेतात खोप बांधुन काळ्या आईची पुजा करतात.
लातुरसारख्या शहरात ह्या दिवशी अघोषीत संचारबंदी असल्यासारखी असते, कलेक्टर डिक्लेअर्ड हॉलीडे
असतो. बँकाना वगैरे सुटी नसते पण लोक सकाळपासुनच शेतात गेल्यामुळे काम फारसे नसते. व्यापारी
प्रतिष्ठाने व ईतर व्यवहार पुर्णपणे बंद असतात.
नुकत्याच आलेल्या वाटाणा , तुरीचे दाणे घालुन केलेली भाजी ( भज्जी ), तीळ गुळ, शेंगदाण्याची गोड पोळी, ज्वारी व बाजरीची भाकरी, धपाटे, भात व ताकास ज्वारीचे पीठ लावुन केलेली आंबील अशा पदार्थांचा आस्वाद घेण्यात येतो.
उत्तरपुजेचे वेळी गवताच्या पेंड्या पेटवुन शेतात फिरवतात व होलगा , होलगा म्हणतात.
होलगा हा शब्द कानडी असावा, पण बहुधा सम्रुध्धी येवु दे असा काहीसा अर्थ असावा.