
दैनिक चालू वार्ता हातकणंगले प्रतिनीधी- कवि सरकार इंगळी
इंगळीत परवा झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत सरपंच पदासह १६पैकी ८उमेदवार हे गावातील वेगवेगळ्य़ा चार प्रभागमधून निवडून आले आहेत.
प्रभाग चारमधील उमेदवार लोकनियुक्त सरपंच दादासो धोंडीबा मोरे,सौ,सिमा निवास मोरे ,हौ आक्काताई धनपाल बिरांचे,हे एकाच गल्ली एकमेकासमोर शेजारी शेजारी राहातात. याच वॉर्डातील मियालाल महमद पटेल,तसेच इरशाद चाॅदसो नायकवडी, व त्यांच्या भावाची पत्नी सौ,सुमय्या जब्बार नायकवडी हे एकाच कुंटूबात राहातात.त्यांच्या शेजारी राहाणारे सौ,अश्विनी उमेश मगदूम आणि याच वार्डातील सुरज असम बुगटे हे निवडून आले आहेत.
यापैकी सौ,सिमा निवास मोरे,सुरज बुगटे हे दोन उमेदवार प्रभाग पाच मधून निवडून आले आहेत,तर,सौ,सुमय्या जब्बार नायकवडी हे प्रभाग एकमधून निवडून आले आहेत.तसेच सौ,आक्काताई धनपाल बिरांजे या प्रभाग दोन मधून निवडछन आले आहेत. एकंदरीत पाच प्रभाग मधून प्रभाग चार मध्ये वास्तवास असणारे ८उमेदवार हे इतर प्रभाग मध्ये निवडणूक लढवून एकाच प्रभाग मधील असलेने १६पैकी ८उमेदवार निवडून येणेचा विक्रम केलेने गावात चर्चचे विषय बनला आहे.