
दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी -दिपक काकरा.
जव्हार:-तालुक्यातील प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेत पुरस्कार प्राप्त असलेली ग्रुप ग्रामपंचायत कौलाळे या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषद शाळा कौलाळे येथील शालेय मैदान सपाटीकरणाचे भूमिपूजन जव्हार पंचायत समितीचे माजी उपसभापती चंद्रकांत रंधा व ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच वैशाली धोडी यांच्या उपस्थितीत पार पडले.त्यामुळे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मैदानी सपाटीकरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.मैदान सपाटीकरण होणार असल्याने कौलाळे येथे असलेले कौलाळेश्वर शिव मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी आता मोठे मैदान उपलब्ध होणार असून या ठिकाणी हरिभक्त पारायण,महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन गावकऱ्यांकडून करण्यात येते.
मात्र अडचणीची जागा आणि मोठ-मोठ्या खड्ड्यामुळे स्थानिक गावकऱ्यांना हे कार्यक्रम पार पाडण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागत होती.त्यामुळे आता जि.प शाळेच्या मैदानाचे सपाटीकरण होणार असल्याने शाळेतील मुलांना खेळाच्या मैदानासोबतच गावाच्या कार्यक्रमाला येणाऱ्या समस्या मिटणार असल्याने गावकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.या मैदानी सपाटी करण्याच्या भूमीपूजना प्रसंगी ग्रामपंचायतचे उपसरपंच शंकर मेढा मा.उपसरपंच सुभाष मुरथडे,सदस्य प्रदीप निकुळे,दिलीप डोबा,दिनेश कलिंगडे,भास्कर जाबर,सदू टोके,अशोक धोडी व मदन टोकरे तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.