
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : हजारो-लाखो भाविक भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या चारठाणा येथील पंचमुखी मारुती रायांना बसवलेले चांदीचे डोळे पुन्हा एकदा चोरीला गेले आहेत. आश्चर्यकारक म्हणजे महिनाभरापूर्वीच एकदा हे डोळे चोरीला गेले होते. भक्तांच्या श्रध्दास्थानांविषयी घडलेला हा प्रकार बघून अनेकांच्या भावनेला ठेच पोहोचली होती. त्यामुळे आठ दिवसांपूर्वीच पुन्हा नव्याने चांदीचे डोळे बसवून भाविक भक्तांनी कार्य पूर्तीस नेले होते. तथापि ते सुध्दा न पाहवलेल्या अज्ञात चोरांनी मारुती रायांच्या डोळ्यावरती पुन्हा एकदा डल्ला मारुन आपले इक्षिप्त साध्ये केल्याचे दिसून आले.
मूर्ती दगडाचीच का असेना परंतु रामभक्त असलेल्या तत्कालीन जीवंत मारुती रायाच्या रुपामधील या मूर्तीलाच नतमस्तक होणाऱ्या भाविक भक्तांना श्रद्धेपोटी आदरयुक्त असलेला भीतीचा दरारा डल्ला मारणाऱ्या या अज्ञात चोरांना का बरं राहिला नसावा हा एक चिंतेचा व चिंतनाचा विषय असला तरी त्याचा शोध घेणे आवश्यक नसावा का असावा हा भाग गहण आहे किंबहुना हे देवी देवतांच्या मागे लागलेले चोरांचे असे ग्रहण नेमकं कधी कधी आणि कसं सुटलं जाईल हे सांगणं मात्र कठीण होऊन बसले जाते स्वाभाविक आहे. देवी- देवतांना ही न घाबरणाऱ्या या चोरांना आता कशाचीच भीती उरली नाही, जणू असेच दिसून येत आहे.
जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील पंचमुखी मारुती रायांवर आलेले हे चोरांचे बलंट कधी व कसे दूर होईल, हे मारुती रायाच जाणोत तथापि खाकी वर्दीत ज्यांची मानवांना भीती वाटते तशी या मानवरुपी चोरांना का वाटत नसावी, हे सुध्दा न कळण्याच्या पलिकडचे आहे. दरम्यान यापूर्वी झालेल्या या चोरी प्रकरणी पोलिसांनी वेळीच दखल घेतली असती तर कदाचित पुन्हा ही चोरी झालीच नसती परंतु मामला तसा मोठ्या रकमेचा नव्हता म्हणूनही पोलिसांनी यात लक्ष घातले नसावे. चोरी ही चोरीची असते, मग ती रुपये पाचशेची असो वा तीन हजारांची. शेवटी प्रश्न आहे तो भावनेचा. हजारो, लाखो भाविक भक्तांच्या भावनेशी खेळले जाणाऱ्या चोरांचा. भीती मग ती आदरार्थी असो वा दंडेलीची. नितीमत्ता सोडता कामा नये एवढे खरे. पोलिसांनी आता तरी विशेषत्वाने लक्ष घालून यात लिप्त चोरांच्या मुसक्या आवळणे गरजेचे ठरणार आहे. अन्यथा महिलांची मॉर्फरुपी बदनामी प्रकरणी ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी उदासीनता दाखविली त्यामुळे एका अधिकाऱ्यांवर निलंबनाची तर दुसऱ्यांवर नित्या अशा ठिकाणी बदली करुन त्यांना जी शिक्षा दिली आहे,तशीच याप्रकरणी सुध्दा होऊ शकेल की नाही, हे येणारा काळच ठरवू शकेल. जिंतूर तालुक्यातील सर्वच पोलिसांना कर्तव्यात प्रामाणिक पणा व निष्ठा राहिलेली नसून केवळ आणि केवळ उदासीनताच शिल्लक राहिली गेली आहे की काय जणू अशीच शंका येणे स्वाभाविक आहे.