
दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी- दशरथ आंबेकर
किनवट तालुक्यातील तेलंगणा सीमेवरअसलेल्या मौजे मार्लागुंडा गावातील पडलेल्या सरपंच पदाच्या उमेदवारांनीआपल्या व्यथा दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधीशीं बोलताना मांडल्या आहेत.अंगणवाडी तथा बी.एल.ओयांच्या चुकीच्यां कामामुळे मी पडलोआहे.सविस्तर माहितीअशीआहे की,किनवट तालुक्यातील ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया पार पडलीअसुन १८तारखेला मतदान झाले व २०तारखेला मतमोजणी झाली या मतमोजणीत अर्चनाबाई देविदास राठोड यांना १७६ मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी शंकर सजन राठोड यांना १७० मते मिळाली केवळ तीन-चार मतांनी पराभव झाल्यामुळे, त्यांचा रोष किनवट तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांच्यावर निघताना पाहावयास मिळाला कारण ग्रामपंचायत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांना दिनांक २३/ ०९/२०२२रोजी ठोस पुराव्यासहअर्ज देऊन मतदार हे कित्येक वर्षापासून महाराष्ट्र आणि तेलंगणाअशा दोन्ही राज्याचा फायदा घेतआहेत.अशा लोकांची चौकशी करून मतदान यादीतून नावे वगळून टाकण्यात यावेअशी विनंती केली होती.परंतु आमच्या अर्जाची दखल तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांनी कोणतीही दखल घेतली नसल्यामुळे, तेलंगणात रहिवासी असलेले तेथील मतदार यादीत नावअसलेल्या लोकांना आणून बोगस मतदान केल्यामुळेआमचा पराभव झालाआहे.असा आरोप शंकर सजन राठोड यांनी केलाआहे.दिलेल्याअर्जा नुसार मतदान यादीची छाननी केली असती,तर माझा पराभव झाला नसता,मौजे मार्लागुंडा येथील शंकर चोकाला जाधव सरपंच यांची सूनबाई बी.एल.ओ व अंगणवाडी कार्यकर्ती जवळचीअसल्यामुळे जाणीवपूर्वक त्यांनी मतदान यादीची दुरुस्ती केली नाही.त्यांच्यावर तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी कोणतेही नियंत्रण किंवा बाजूला ठेवले नाही.त्यामुळे माझा पराभव झालाआहे.असा गंभीर आरोप शंकर सजन राठोड यांनी केलाआहे.येणार्रा काळात मा.न्यायालयात जाऊन संबंधित दोषीं तहसीलदार व निवडणूक विभागातील अधिकारी-कर्मचारी यांच्यावर खटले दाखल करुन निवडणूकी वर स्टे आणणारं असल्याचे ही शेवटी त्यांनी सांगितलेआहे.हा वाद आता कोर्टात जाणार आहे.