
दैनिक चालू वार्ता देगलुर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर प्रतिनिधी:देगलूर शहरातील गुंडा महाराज मठा लगत मांस विक्री करणा-यावर प्रशासनाची नोटीस नांदेड. मागील काही काळापासून देगलूर येथील तहसील कार्यालय नगरपालिका उपजिल्हा कार्यालय या ठिकाणी निवेदन देऊन विनंती पण या विषयाकडे प्रशासनाचे अजिबात लक्ष दिलं नाही.कि
कार्यवाही झाली नाही, याबाबत. संदर्भ :- श्री. दिंगबर रमेश कौरवार, देगलूर बिलोली विधानसभा प्रमुख, संपर्क- माधव निवास, बापु मार्केट, जुना पंप हाऊस रोड, देगलूर, जि. नांदेड यांचे निवेदन ईमेलद्वारे प्राप्त दि. 15/12/2022 रोजी या कार्यालयास ईमेलद्वारे प्राप्त झाले आहे. सदर निवेदनाद्वारे देगलुर शहरातील गुंडा महाराज मठा लगत मांस विक्री करणा- यावर प्रशासनाची नोटीस जाऊन सुध्दा अद्याप कार्यवाही झाली नसल्याबाबत नमुद केले आहे.
संदर्भीय निवेदनाची छायांकित प्रत या पत्रासोबत आपणास पाठविण्यात येत असुन सदर निवेदनात नमुद मागण्याबाबत आपल्या स्तरावरून नियमानुसार उचित कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाही बाबत संबंधितास कळविण्यात येऊन केलेल्या कार्यवाहीची प्रत आठ दिवसात या कार्यालयास पाठविण्यास सांगितले आहे. तरी शासनाने याकडे लवकरात लवकर लक्ष घालून त्या परिसरातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित करावे अशी त्या परिसरातील नागरिकांचे मान्य आहे.