
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम -तालुक्यातील मौजे हाडोंग्री येथील धाराशिव विको विलेज केंद्राला उस्मानाबाद जनता सहकारी लिमिटेड बँकेच्या संचालक मंडळाने भेट देऊन परिसराची पाहणी केली.
यावेळी धाराशिव विको विलेज च्या वतीने उस्मानाबाद जनता सहकारी लिमिटेड बँक चे अध्यक्ष वसंत नागदे त्यांच्या संचालक मंडळाचा सत्कार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर यांच्या हस्ते करण्यात आला धाराशिव युको व्हिलेज मध्ये लावलेल्या वनस्पतींची पाहणी करून त्याचे महत्त्व समजावून घेतले.
यावेळी वैजनाथ शिंदे, उपाध्यक्ष संचालक विश्वास शिंदे, निवृत्ती भोसले एस व्ही, गोविंदपुरकर नंदू नागदे, पिके जाधव, तानाजी चव्हाण मुख्य कार्यकारी अधिकारी,डॉ संजय घोडके, व्यवस्थापक महादेव गायकवाड, शिंदे जयसिंग ,शिंदे पांडुरंग, शाखा अधिकारी शिवाजी बुद्रुके ,दत्तात्रेय पवार ,शाखा व्यवस्थापक भूम यांच्या सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.