
दैनिक चालू वार्ता अहमद्पुर प्रतिनिधी-विष्णू पोले
काळाच्या ओघात दिवसेंदिवस श्रमाचे महत्वकमी होत चाललं आहे हे आपणाला नाकारून चालणार नाही पण खरी संस्कृती निर्माण होते ती श्रमातून.श्रमात आणी कर्मात खोलवर शिरल्या शिवाय स्वाभिमान आणी अस्मिता जागी होत नाही.श्र मल्या नेच घामाचे मोती होतात.अनेकांना जीवानंदिशा मिळते,दुर्दैव हे की श्रमाची दिशा आपण समजून घेतली पाहिजे.
आळशी मनुष्याला पोसणारी पापी आणी आळशी ही पापी.कोणा आळशाला आपण वावं देतो तेंव्हा तो मिंदा, दिनवान असतो.आपण मात्र ऐटीत असतो.याच्या उलट आपण त्याच्या कडून काही तरी काम करून घ्यावे.लाकडे फोडून घ्या,कपडे धुऊन घ्या,जमीन खाणून घ्या,काहीतरी काम करून घ्या,त्यात खरोखरच त्या माणसाचा उद्धार आहे.
उद्योगहिनास पोसण्यात देवाचा पण अपमान आहे.देवाने दिलेल्या हातापायचा,बुद्धीचा अपमान आहे.स्ववलंबन,स्वाभिमान,श्रमाची महती आज रशियात शिकवण्यात येत आहे.नुकताच एक मानसशास्त्रज्ञ रशियात गेला होता रशियातील परिस्तिथी ,तेथील अंतरबाह्य परिवर्तन पाहावयास तो गेला होता.
मजुरांना वाटण्यासाठी म्हणून त्याने झरण्या (फाउंटन पेन)चॉकलेटच्या वड्या,सुंदर चाकू वगैरे वस्तू सोबत घेतल्या होत्या.मजुरांच्या चाळीत जाऊन तो त्यांना बक्षीस म्हणून देऊ लागला,परंतु त्यांनी ते घेण्यास नकार दिला,”तो म्हणाला घ्या मी तुम्हाला प्रेमाने देत आहे”ते मंजूर म्हणाले “स्वतःच्या श्रमाने मिळवावे,दुसर्याने दिलेली देणगी घेऊन कदाचित मनात आलंस्य् ,मिंधेपणा,व परवलंबन याचा उदय वाहायचा” या दुर्गुणांना थोडाही वावं द्यायचा नाही हे आम्ही ठरवले आहे.
श्रमात आत्मोद्धार आहे,फुकट घेण्यात व फुकट देण्यात पत्तन आहे.हे हिंदी मुलांना तमाम हिंदी जनतेला समजेल तो सुदिन आहे.घरीदारी शाळेत हे शिक्षण देण्यात आल पाहिजे .उष्ठे कुणाला घालू नये असा धर्म असा धर्म नियम झाला पाहिजे .खरा धर्म श्रमाना उतेजण देणे हाच होय.आळसाने भिक मागणारा व श्रीमंत असल्यामुळं गादयावर लोळून खाणारा दोघे किडेच! श्रीमंत पण दुसऱ्याच्या श्रमानेच खातो हे दोघे समाज व्रक्षावरील बांडगुळे होत.
उन्हाताणात काम करणारा मजूर, रस्ते झाडणारा झाडूवाला,मुलमूत्र नेणारा भंगी,मेलेली गुरे फाडणारा ढोर,वाहणं बांधणारा चांभार हे सारे आयते खाऊ लोकापेक्षा पवित्र आहेत.काहीतरी निर्माण करा ,विचार निर्माण करा,धान्य निर्माण करा,स्वच्छता निर्माण करा,काहीतरी मंगल,सुंदर,हितकर, असे निर्माण करा.तरच जगण्याचा तुम्हाला अधिकार आहे.ज्या राष्ट्रात समाजसंवर्धक,समाजरक्षक,समाज पोषक श्रमाची पूजा होते ते राष्ट्र वैभवावर चढते,बाकीचे भिकेला लागतात.
श्रमाची पूजा अगोदर एकट्याला सुरुवात करावी लागेल.या प्रसंगी लोकांच्या टिकेचा झंझावात सुटेल,तुझ्या हातातील दिवा विझेल ,परंतु तो पुन्हा पेटव व पुढे पाऊल श्रमण्यासाठी टाक ,अगोदर एकट्यानेच जगण्यासाठी धडपडावे लागते ,स्वतःचा रस्ता स्वतः निर्माण करावा लागेल.
तसा आज काळ बदलला श्रमाची जागा यंत्राने घेतली.अनेक वस्तू यन्त्रा द्वारे निर्माण होऊ लागल्या,वस्तूंची संख्या वाढली तशी विक्री साठी स्पर्धा वाढू लागली हव्यास वाढल्यामुळे श्रमा पेक्षा पैशाला महत्व आले.पैसा हा सर्वस्व बनला.मग तो पैसा श्रम सोडून अन्य मार्गाने का होईना घरी आला पाहिजे असे प्रत्येकाला वाटू लागले मग पैसे मिळवण्यासाठी अनेक कुरापती वाढल्या.श्रमनाची पूजा न होता पैशामुळं समाजात प्रतिष्ठा वाढवणाऱ्यांची पूजा होऊ लागली. ते वेगवेगळ्या मार्गाने राजकारणात प्रवेश करू लागले,श्रमाचे महत्व,श्रमाचा पाया,बांधवाविषयीं असलेली कोरड्या सहानुभूतीने सध्या जागा घेतली आहे.हे असेच चालत राहिले तर हा समाज श्रमाविना पोखरत राहिला जाणार.बाह्य बाजूने झाकलो गेलो असलो तरी अंतर्भाग पोखरल्यामुळे समाजाची म्हणावी तशी जडणघडण होणार नाही.पर्यायी राष्ट्राची वैभवाकडे होणारी वाटचाल मंदावेल्.
काळ कोणताही असो श्रमाचा असो की विज्ञान। तंत्रज्ञानाचा अखेर कोणत्याही मार्गाने श्रम करावेच लागतात.श्रमातून मिळवलेल्या संपत्तीत एक नैतिक धैर्य असते.जे अनेकांचा मुकाबला करू शकते.सन्मार्गाने जगण्याचे बळ श्रमाने येते.ते विनवणीने येत नाही हे लक्षात ठेवण्याजोगे आहे.
लेखक
दयानंद बिरादार.
साने गुरुजी विद्यालय,येस्तार .ता.अहमद्पूर जि. लातूर.
मो.नं-8767712994