
दैनिक चालु वार्ता देगलूर ग्रामीण प्रतिनिधी- माणिक सुर्यवंशी
अटकळी येथील किशोर माध्यमिक विद्यालयात विविध उपक्रम राबविले जातात यात दर दिवशी प्रत्येक वर्गाच्या विद्यार्थ्याने आदर्श परिपाठ सादर करत असतात यामध्ये सुविचार, प्रकट वाचन, मराठी हिंदी इंग्रजी मध्ये प्रार्थना, संविधान , माझा परिवार माझा संकल्प,विद्यार्थ्यांना वैज्ञानिक माहिती असावी म्हणून शास्त्रज्ञ विषयी माहिती, विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढवावी यासाठी मेमरी गेम, देशात कुठे काय घडले याची माहिती असावी म्हणून बातम्या, एकमेकांना अभ्यासक्रमावर आधारित व इतर प्रश्न विचारणे म्हणजेच सुपर पार्टनर, स्पर्धा परीक्षेत ची पूर्वतयारी म्हणून सामान्य ज्ञानाचे रोज पाच प्रश्न दिले जातात प्रत्येक ऋतूत आपला आहार कसा असावा व प्रत्येक फळाचे उपयोग हे आहार आरोग्य मध्ये सांगितले जाते व तसेच पौराणिक मराठी हिंदी इंग्रजी मधून कथा सांगितले जातात व शेवटी ध्यानधारणा घेऊन व्यायामाचे महत्त्व सांगितले जाते शाळेमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा व शिक्षकाचा वाढदिवस आहे त्या दिवशी पुष्पगुच्छ देऊन साजरा केला जातो वरील सर्व क्रम हे ज्ञान संवर्धन शिक्षण प्रसारक म्हणून मंडळ धुप्पा चे साचिव संजय पाटील शेळगावकर साहेब यांच्या कल्पनेतून त्यांच्या पाचही शाळेत हे उपक्रम राबविले जातात यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व बौद्धिक क्षमता ,स्टेज करेज अशा विकास होत आहे यापैकीच एक भाग म्हणून आपल्या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौ वर्षा ताई ठाकूर मॅडम यांनी सुचवलेल्या प्रत्येक शाळेत शास्त्रज्ञाचा जन्मदिवस साजरा करण्यात यावा म्हणून किशोर विद्यालयात थोर गणिती शास्त्रज्ञ भारताचा एक कोहिनूर हिरा श्रीनिवास रामानुजन यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शाळेचे प्राचार्य श्री राजेश्वरआटकळे सर यांनी श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन केले नंतर त्यांच्या जीवनाविषयी माहिती श्री अटकळे सर शेटकर सर यांनी सविस्तर सांगितले व त्यानंतर पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी या वर्गाचे राष्ट्रीय गणित दिनानिमित्त विद्यार्थ्याचे गणित स्पर्धा परीक्षा घेण्यात आली या स्पर्धेत आठवी ते दहावीच्या गटात सर्वप्रथम सुरज बोंगाळे, सर्व द्वितीय शेख मुस्कान फरीद, अंकिता सुधाकर चिंतावार, आर्या दत्ता मेहत्रि आले तसेच इयत्ता पाचवी ते सातवी गटात सर्वप्रथम कुमारी प्राची सुरेश येवते सर्व द्वितीय कृष्णा मल्लेश बटलवाड, कुमारी वैष्णवी मगर पोलकमवाड या विद्यार्थ्यांचा शाळेचे प्राचार्य श्री अटकळे सर यांनी गणितासाठी उपयोगी येणारे कंपास पेटी व भौमितिक रचनेसाठी वह्या देण्यात आले यावेळी श्री विभुते सर , शेटकर सर गव्हाणे सर बैस सर कनशेट्टे सर पेंटे सर मोरे सर कचवे सर आदी मंडळी उपस्थित होती