
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर: देगलूर तालुक्याचे भूमिपुत्र व्यंकट पाटील केदारकुठेंकर यांचा मुलगा प्रिय रोहल पाटील यानी अमेरिकेतील Texas University मधून मँनेजमेंटचे उच्चशिक्षण घेऊन शिकागो येथील मोठ्या कंपनीमध्ये नोकरीसाठी त्याची निवड झाली आहे. आज रोहलचा व आपल्या मुलाप्रमाणेच पुण्यात अनेकांना शिक्षण व नोकरीसाठी पाठबळ देणारे व्यंकटदादा पाटील यांचा देगलूर येथे यथोचित स्वागत सत्कार करताना आम्ही सर्व स्नेही मंडळी….
यावेळी दुबई येथे इंजिनियर म्हणून यशस्वीपणे कार्यरत असणारे आमचे मेव्हणे श्रीनिवास पटेल यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
आपल्या परिसरातून, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या लेकरांना परदेशात शिक्षणासाठी प्रेरणा मिळावी व सोहलनी नवनवीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व पाठबळ द्यावे अशी अपेक्षा मी यावेळी व्यक्त केलो. त्यांच्या या यश प्राप्तीसाठी देगलूर शहर व देगलूर तालुक्यातील अभिनंदन वर्षा होत आहे.