
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा –
(बुलढाणा/प्रतिनिधी):- येथील राजेंद्र शंकर वाघ वन खात्यामध्ये लेखापाल या पदावर नोकरी करतात. सामाजिक कार्याची आवड असल्याने लग्नाचा वाढदिवस मुलांचे वाढदिवस अश्या प्रकारे विविध कार्यक्रमावरील होणारा इतर खर्च टाळून ते नेहमी गरजूंना मदत करतात वृद्धाश्रम व मनोरुग्ण सेंटर बुलढाणा या ठिकाणी किराणा साहित्य देऊन व रक्तदान शिबिरांमध्ये सहभागी होऊन स्वतः रक्तदान करून रक्तदानाविषयी जनजागृती मोहीम राबवितात तसेच बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयामध्ये गरजूंना भोजनाची व्यवस्था करतात नातेवाईकांमध्ये मुला-मुलींना विवाह जोडणे यासाठी मध्यस्थी भूमिका ठेवून स्थळ दर्शवुन विवाह जुळविण्यामध्ये ते अग्रेसर असतात नाभिक समाजातील दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा दरवर्षी सत्कार सोहळ्याचे आयोजन करून त्यामध्ये शिक्षणाचे महत्त्व पटवून देतात व गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करतात तसेच विविध सामाजिक उपक्रमामध्ये ते नेहमी अग्रेसर असतात त्यांना आत्तापर्यंत जिल्हास्तरीय समाजभूषण पुरस्कार २०१८ मध्ये मिळाला आहे. व राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार २०२० मनुष्यबळ विकास अकादमी कडून मिळाला आहे. त्यांच्या या सर्व सामाजिक कार्याची दखल घेऊन यंदाचा सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करन्यात येनार आहे. हा पुरस्कार सोहळा सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्था व माणुसकी रुग्णसेवा समूह घाटी औरंगाबाद मार्फत दिला जाणार आहे. औरंगाबाद येथे मोठ्या थाटात सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळा व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन दि.३० डिसेंबर रोजी मौलाना आझाद रिसर्च सेंटर टिव्ही सेंटर औरंगाबाद येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. असे निवड समिती तर्फे पत्राद्वारे समाजसेवक सुमित पंडित यांनी कळविले आहे. ह्या पुरस्काराने समाजा माध्यातून राजेंद्र वाघ यांचे कौतुक होत आहे.