
दैनिक चालू वार्ता म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
रा. जि. प. शाळा तुरंबाडी येथील विदयार्थ्यांना कोकणी डॉक्टर यांच्या वतीने गरजू वं गरिब विद्यार्थ्यांना एक सामाजिक बांधीलकी वं आपले कर्तव्य म्हणून शालेय साहित्य वह्या, पेन, पेन्सिल,शॉपणर जवळ जवळ 104 विद्यार्थ्यांना या वस्तू वाटप करण्यात आल्या.
या वेळी कोकणी डॉक्टर असोशियन चे अध्यक्ष वसीम फोपळूजकर, उपाध्यक्ष डॉ नसीम खान, डॉ इमरान फकीह, सदस्य डॉ नदीम देवरे हे उपस्थित होते, मान्यवरांचे पुष्पगुच्य देऊन शाळेच्या वं शाळा व्यवस्थापन कमेटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. या मुख्याद्यापक श्री कळस सर, शाळा व्यवस्थापन कमेटीचे अध्यक्ष गोपीचंद चव्हाण, श्री शशी भिंगारदिवे,श्री काणेकर सर, श्री विपुल चक्करवार सौ शिंदे मॅडम हे उपस्थित होते या वेळी पुरुषोत्तम पाटील, श्री चव्हाण यांनी कोकणी डॉक्टर असोशियनचे कार्य वं त्यांची सामाजिक कार्याचा आढावा घेऊन त्यांचे कौतुक केले, श्री चक्करवार सर यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले या वेळी ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.